लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला न आल्यास फॉर्म रद्द, धमकीचा मेसेज, सुप्रिया सुळेंचा संताप

पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या आजच्या कार्यक्रमाला ज्या भगिनी येणार नाहीत, त्यांचे फॉर्म रद्द होतील, असा धक्कादायक मेसेज पाठवला जात असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया अकाऊण्टवरुन केला आहे. हिंमत असेल तर या कार्यक्रमाला न जाणाऱ्या एका तरी बहिणीचा फॉर्म रद्द करुन दाखवाच, असं थेट चॅलेंजच सुप्रिया सुळेंनी दिलं आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या रक्कम अदा करण्याच्या कार्यक्रमाला हजर न राहणाऱ्या बहिणींचे फॉर्म रद्द करण्याचे धमकी देणारे हे स्वतःला ‘भाऊ’ म्हणवत आहेत. बहिणीला कार्यक्रमाला बोलावणार आणि त्यांची गर्दी दाखवून स्वतःची पाठ थोपटून घेणार, अरे सत्तेत बसलेल्या भावांनो, ‘बहिण-भावाचं’ नातं एवढं स्वस्त नसतं, असं सुप्रिया सुळेंनी ट्वीट करत ठणकावलं आहे.

बहिणींकडे प्रेमाने काही मागितलं तर बहीण त्याला ‘नाही’ म्हणत नाही. पण तिला धमक्या देऊ लागलात तर ती कुणालाच घाबरत नाही हे लक्षात ठेवा. हिंमत असेल तर या कार्यक्रमाला न जाणाऱ्या एकातरी बहिणीचा फॉर्म रद्द करुन दाखवाच, असा इशारा सुप्रिया सुळेंनी दिला आहे.

काय आहे व्हॉट्सअपवर पाठवलेला कथित धमकीचा मेसेज?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना लाभाची रक्कम अदाकरणाच्या अनुषंगाने शनिवारी दिनांक १७ ऑगस्ट २०२४ रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल बालेवाडी स्टेडियम पुणे येथे राज्यस्तरीय शुभारंभाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तरी ज्या महिलांनी हा फॉर्म भरला आहे व त्याचे approved मेसेज आला आहे त्यांनी या कार्यक्रमाला हजर राहावे.
Milind Narvekar : उद्धव ठाकरेंचा वापर मित्रपक्ष प्रचारासाठी करुन घेतील, शिवसैनिकाचं मिलिंद नार्वेकरांना पत्र
यासाठी पुणे महानगरपालिकेने अहिल्याबाई होळकर बचत गट हॉल सुखसागर पोलीस चौकी येथून निघण्यासाठी बसची व्यवस्था केलेली आहे. तसेच अल्पोपहाराची पण व्यवस्था केलेली आहे. शनिवारी सकाळी ९.३- वाजता अहिल्यादेवी होळकर बचत गट हॉल पोलीस चौकी येथून बसची सोय केलेली आहे. या कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे. सर्वांनी येणे आवश्यक आहे. ज्या महिला येणार नाहीत त्यांचा फॉर्म रद्द होईल.

Source link

Ladki Bahin Pune Balewadi ProgramSupriya Sule on Ladki Bahinएकनाथ शिंदे सरकार योजनामहाराष्ट्र सरकारी योजनामुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनालाडकी बहीण योजना धमकी मेसेजसुप्रिया सुळे लाडकी बहीण योजना
Comments (0)
Add Comment