रविवार १८ ॲागस्ट २०२४, भारतीय सौर २७ श्रावण शके १९४६, श्रावण शुक्ल चतुर्दशी उत्तररात्री ३-०४ पर्यंत, चंद्रनक्षत्र: उत्तराषाढ सकाळी १०-१४ पर्यंत, चंद्रराशी: मकर, सूर्यनक्षत्र: मघा
चतुर्दशी तिथी मध्यरात्री ३ वाजून ५ मिनिटांपर्यंत त्यानंतर पौर्णिमा तिथी प्रारंभ, उत्तराषाढा नक्षत्र सकाळी १० वाजून १५ मिनिटांपर्यंत त्यानंतर श्रवण नक्षत्र प्रारंभ, आयुष्यमान योग सकाळी ७ वाजून ५१ मिनिटांपर्यंत, त्यानंतर सौभाग्य योग प्रारंभ, गर करण ४ वाजून २९ मिनिटांपर्यंत त्यानंतर विष्टी करण प्रारंभ, चंद्र दिवस रात्र मकर राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-२२
- सूर्यास्त: सायं. ७-०३
- चंद्रोदय: सायं. ६-१३
- चंद्रास्त: पहाटे ४-३१
- पूर्ण भरती: सकाळी ११-०८ पाण्याची उंची ४.२४ मीटर, रात्री ११-०५ पाण्याची उंची ३.७७ मीटर
- पूर्ण ओहोटी: पहाटे ४-१५ पाण्याची उंची ०.७४ मीटर, सायं. ५-११ पाण्याची उंची १.७४ मीटर
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून २५ मिनिटे ते ५ वाजून ८ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३६ मिनिटांपासून ते ३ वाजून २८ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून ३ मिनिटांपासून ते १२ वाजून ४७ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ६ वाजल्यापासून ५७ मिनिटांपर्यंत ते ७ वाजून १९ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ९ वाजून ८ मिनिटांपासून ते १० वाजून ४७ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ संध्याकाळी साडे चार ते सहा वाजेपर्यंत, दुपारी साडे तीन ते साडे चार वाजेपर्यंत गुलिक काळ, दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ संध्याकाळी ५ वाजून १३ मिनिटांनी ते ६ वाजून ५ मिनिटांपर्यंत, भद्राकाळ रात्री ३ वाजून ४ मिनिटांपासून ते ५ वाजून ५३ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय
आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करा.
(आचार्य कृष्णदत्त)