गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे अनेक प्रमुख नेते विदर्भात आले आहे. सर्व जिल्ह्यात पक्षाचे नेते जाऊन आले आणि आढावा घेतला. विदर्भातल्या सर्वच जागा संदर्भात आम्ही आढावा घेतला आहे. या वेळेला नागपूर शहरांमध्ये शिवसेना विधानसभेची एक जागा लढवणार आहे. तसेच रामटेक विधानसभेची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट लढवणार आहे. त्या दृष्टीने शिवसेनेचे कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांच्याशी चर्चा होईल. निवडणुका जवळ आली आहे आणि महाराष्ट्राच्या उपराजधानी मध्ये शिवसेनेचे अनेक दिवसांपासून काम चालू आहे.
महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेने रामटेक लोकसभाची जागा काँग्रेसला दिली. त्यामुळे विधानसभेत महाविकास आघाडी म्हणून नागपूर शहर आणि ग्रामीण मध्ये एक एक जागा आम्ही लढवू. यावेळी विदर्भामध्ये महाविकास आघाडीला उत्तम यश मिळाले आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाला वर्धात जागा मिळाली यवतमाळ वाशिम ची जागा शिवसेनेला आली. तसेच विदर्भात काँग्रेसलाही लोकसभेत उत्तम यश मिळाले आहे. त्यामुळे विदर्भात महाविकास आघाडीचे यश पाहता महाविकास आघाडी विदर्भात चांगला स्कोर करेल या शंका नाही.
देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेत विरोधक खोड करत असल्याची टीका केली होती. त्यावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, कोणीही खोड टाकत नाही. हे सगळं स्वप्न आहे त्यांना स्वच्छ आणि स्पष्ट दिसत नाही. आणि ऐकू येत नाही. कोणत्याही चांगल्या योजनेपासून महाराष्ट्राच्या जनतेला, महिलांना, बेरोजगारांना फायदा होईल अशी योजना ही कोणाच्याही खाजगी मालकीची नसते, ती सरकारची असते. त्याच्यामध्ये खोडा टाकण्याचे काम आम्ही करणार नाही. ते नरेंद्र मोदी करतात, त्यांनी केले आहे . काँग्रेसच्या योजना त्यांनी स्वतःच्या नावाने खपवल्या आणि काँग्रेसला शिव्या घातल्या. महाराष्ट्र मध्ये ही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेक योजना निर्माण केल्या पण या सरकारने त्या योजना बंद करण्याच्या प्रयत्न केला आहे.
राहुल गांधी यांच्या यांनी खटाखट पैसे देऊ असे म्हटले होते त्यावर फडणवीस म्हणाले आम्ही फटाफट पैसे दिले. यावर संजय राऊत म्हणाले, फडणवीस यांच्या नागपूरच्या घरामध्ये टांकसाळ लावली आहे. ते पैसे छापतात खटाखट. हे सरकारी पैसे आहे. आमचे सरकार आलं असतं तर राहुल गांधी म्हणाले तसे खटाखट, टकाटक ,पटापट सर्व झालं असतं. आणि हे महाराष्ट्रात लवकरच होईल असेही संजय राऊत म्हणाले.