रेलिंगवर चढून खाडीत फोटो टाकण्याचे प्रयत्न, तोल गेला, पोलिसांनी सीसीटीव्हीत पाहिले अन्…

नवी मुंबई : अटल सेतुवरून उडी टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या व ब्रिजच्या रेलिंगला लटकलेल्या ५६ वर्षीय महिलेला कॅब चालकाने व न्हावाशेवा वाहतूक शाखेतील अंमलदारानी वाचविल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ७ च्या सुमारास घडली. खाडीमध्ये फोटो टाकताना तोल गेल्यामुळे पडल्याचे सदर महिलेने पोलिसांना माहिती दिली आहे.

या घटनेतील ५६ वर्षीय महिला मुलुंड येथे राहण्यास असून, शुक्रवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ती कॅब ओला स्विफ्ट डिझायर टॅक्सीने अटल सेतू ब्रिजवरुन मुंबईकडून शेलगर टोल नाक्याकडे जात होती. याचवेळी सदर महिलेने चालकाला कार थांबवण्यास सांगितले. त्यानंतर सदर महिला अटल सेतूच्या रेलिंगवर चढली असता ती खाली पडली. मात्र याचवेळी कॅब चालक संजय द्वारका यादव (३१) यांनी वेळीच तीला पकडले. यावेळी सदर महिला ब्रिजच्या रेलिंगला लटकून राहिली. ही बाब अटल सेतू टोल नाक्यावरील सीसीटीव्हीवर कमांड सेंटर मधील कर्मचाऱ्यांना निदर्शनास आल्यानंतर त्यांनी ही बाब न्हावाशेवा वाहतूक शाखेतील अंमलदाराना दिली.

त्यानंतर न्हावाशेवा वाहतूक शाखेतील पेट्रोलिंग 1 वाहनावर कार्यरत असलेले पोलीस नाईक ललित शिरसाठ, किरण मात्रे व पोलीस शिपाई यश सोनवणे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलीस अंमलदारांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून कसोशीने प्रयत्न करीत सदर महिलेला सुरक्षित वर काढले.

त्यांनतर पोलिसांनी या महिलेची चौकशी केली असता, खाडीमध्ये देवाचे फोटो टाकण्यासाठी गेली असताना तिचा तोल गेल्यामुळे ती खाडीमध्ये पडल्याचे व त्यावेळी तिने रेलिंग पकडल्याचे पोलिसांना सांगितले आहे.

Source link

Amal Setu BridgeAmal Setu Bridge newsnhavaSheva policeola cab driverwoman falling Atal Setu Bridgeअटल सेतूअटल सेतू पूल महिला वाचलीपोलिसांनी महिलेला वाचवले
Comments (0)
Add Comment