राज्यात वीजेची कमतरता भरुन निघणार, पंप स्टोरेज पद्धतीने वीजनिर्मितीला चालना; पवना अर्जुनेवर जलविद्युत प्रकल्प

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : पवना आणि अर्जुना नद्यांवर लवकरच पंप स्टोरेजवर (उदंचन) आधारित जलविद्युत प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या दोन प्रकल्पांमार्फत राज्याला २७५० मेगावॉट वीज मिळणार आहे. असेच आणखी दोन प्रकल्प अन्यत्र उभे होत असल्याने येत्या पाच वर्षांत राज्याला ५६०० मेगावॉट वीज मिळणार आहे.

कोळसासाठा मर्यादित असल्याने तसेच सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्पांसाठी जागेची आवश्यकता अधिक असल्याने जलविद्युत प्रकल्प हा सर्वाधिक सक्षम हरित ऊर्जा निर्मितीचा स्रोत ठरतो. मात्र, त्यामध्येही १ मेगावॉट विजेसाठी जवळपास १६ हजार लिटर पाण्याची गरज असते. या स्थितीत वीजनिर्मितीच्या संचांवर (टर्बाइन) पाणी सोडले की ते पुन्हा वापरात आणण्याची गरज असते. त्यासाठी ‘उदंचन’ म्हणजेच पंप स्टोरेज पद्धतीच्या वीजनिर्मितीला महत्त्व आले आहे. या पद्धतीत टर्बाइनवर पाणी सोडले की ते पुन्हा पंपाद्वारे वर चढवून त्याचा वीजनिर्मितीसाठी पुनर्वापर शक्य असतो. सध्या राज्य सरकारने या पद्धतीच्या जलविद्युत प्रकल्पांना बळ देण्याचे नियोजन आखले आहे. त्याअंतर्गतच पवना व अर्जुना नद्यांवर असे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.
Mumbai Dams: मुंबईकरांना जलदिलासा! धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा, ३२ प्रमुख धरणांची जाणून घ्या स्थिती
याअंतर्गत अवादा समूहाने राज्य सरकारी महानिर्मिती कंपनीसह राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाशी करार केला आहे. अवादा समूहाची उपकंपनी अवादा ॲक्वा बॅटरीज प्रा. ली. यांच्यामार्फत हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला. याअंतर्गत पुणे आणि रायगड जिल्ह्यातील पवना नदीखोऱ्याच्या खालील भागांत १५०० मेगावॉट व कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील कुंभवडे येथे अर्जुना नदी खोऱ्यात १२५० मेगावॉट क्षमतेचा प्रकल्प उभा होणार आहे. या माध्यमातून पुढील पाच ते सात वर्षांत जवळपास १४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक या क्षेत्रात होणार आहे.
Weather forecast : पावसाची ओढ, उकाड्यात वाढ, महाराष्ट्राची काहिली; पुढील दोन आठवड्यासाठी IMD चा हवामान अंदाज काय?

आणखी दोन प्रकल्प

आणखी दोन प्रकल्प टाटा पॉवर कंपनीकडून उभारण्यात येणार आहेत. भिवपुरी येथे ठोकरवाडी तलावातून पाणी घेऊन त्याआधारे १ हजार मेगावॉट व खोपोली येथील जलविद्युत प्रकल्पाला पाणी देणाऱ्या शिरोटा तलावाजवळ १८०० मेगावॉट वीज क्षमतेचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यासाठीही राज्य सरकारशी सामंजस्य करार झालेला आहे.

Source link

arjuna riverelectric power in Maharashtrahydropower projectspavana riverpump storage electricजलविद्युत प्रकल्पपवना आणि अर्जुना नदीब्रेकिंग बातम्यामहाराष्ट्रातील मोठे प्रकल्पवीजनिर्मिती प्रकल्प
Comments (0)
Add Comment