उद्धव ठाकरेंचा वापर मित्रपक्ष प्रचारासाठी करुन घेतील, शिवसैनिकाचं मिलिंद नार्वेकरांना पत्र

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : महाविकास आघाडीतील इतर पक्ष शिवसेना ठाकरे गटाचा फक्त प्रचारासाठी वापर करून घेतील आणि स्व:ताच्या पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणत, लोकसभा निवडणुकीत घडलं तेच विधानसभा निवडणुकीतही घडवतील. काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेना ठाकरे गटाला मागे टाकेल अशा इशारा देणारे पत्र एका शिवसैनिकाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधान परिषद आमदार मिलिंद नार्वेकर यांना पाठवले आहे.

नार्वेकर यांना पाठवलेल्या पत्रात पुढे म्हटले आहे की, उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित करत असेल तरच त्यांनी विधानसभेसाठी महाविकास आघाडीसाठी प्रचारप्रमुख म्हणून कार्य करावे अन्यथा फक्त आपल्या शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करावा. जेणेकरून आपल्या प्रत्येक उमेदवारावर त्यांचे लक्ष राहील आणि आपले शिवसेनेचे मशालीचेच जास्तीत जास्त आमदार निवडून येतील.
Uddhav Thackeray : काँग्रेस-राष्ट्रवादीने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, माझा पाठिंबा, ठाकरेंची स्पष्ट भूमिका
विनाकारण आपल्याला मुख्यमंत्रिपद मिळेल व महाविकास आघाडीतील अन्य घटक पक्षांची प्रचार प्रसिद्धी करण्यात काही अर्थ नाही. लोकसभेला तसे केल्याने आपल्या जागा कमी झाल्या व काँग्रेस आणि राष्ट्रवादीला त्याचा जास्त फायदा झाला. त्यामुळे ते उगाचच प्रचारप्रमुखाची माळ गळ्यात घालतील आपल्या आणि त्यांचा फायदा करून घेतील असेही या पत्रात म्हटले आहे.
MVA Mumbai Rally : ना पटोले, ना बाबा, ना थोरात, काँग्रेसने सलामीला ‘नाराजा’ला उतरवलं जोरात; कुणी वाढवला नारळ?
महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार का? असा प्रश्न महायुतीतील नेते सारखे विचारत आहेत, पण पृथ्वीराज चव्हाण किंवा शरद पवार यांनी आज मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, जो उमेदवार जाहीर कराल, त्याला माझा पाठिंबा असेल, असं खुलं आव्हान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल दिलं होतं. महाविकास आघाडीच्या प्रचाराचा नारळ मुंबईतील षणमुखानंद सभागृहात वाढवण्यात आला, त्यावेळी उद्धव ठाकरेंनी पहिलं भाषण करत हा प्रश्न विचारला होता.
Nana Patole : ठाकरेंचं भाषण सुरु झालं, पटोलेंना पोहोचायला उशीर, पण मोठी कामगिरी फत्ते, भाजपचा बडा नेता फोडला
दरम्यान, त्यानंतर झालेल्या भाषणांत काँग्रेस किंवा शरद पवार यांपैकी कुणीही ना उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्याला अनुमोदन दिलं, ना साधा ठाकरेंच्या मागणीचा उल्लेख केला, त्यामुळे मविआतील मित्रपक्षांना ठाकरेंचं नाव अमान्य असल्याची चर्चा रंगली आहे.

Source link

maharashtra assembly election 2024Maharashtra politicsMilind NarvekarVidhan Sabha Nivadnukउद्धव ठाकरे भाषणमविआ मुख्यमंत्री उमेदवारमहाविकास आघाडीमहाविकास आघाडी मुंबई मेळावामिलिंद नार्वेकर शिवसैनिक पत्र
Comments (0)
Add Comment