Pune News: पुण्याच्या शेतकऱ्याचा सातासमुद्रपार डंका! विड्याची पाने पोहोचली अमेरिकेत, गुलाब घुले म्हणतात…

पुणे (भोर) : हिंदू संस्कृती विड्याच्या पानाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. प्रत्येक पूजेला पान हे लागतेच. याशिवाय जेवण केल्यानंतर पानाचे अनेक प्रकार खाल्ले जातात. कोणत्याही शुभकार्य पानाशिवाय होऊ शकत नाही. आता ही पाने थेट अमेरिकेत पोहोचले आहेत. पुण्याच्या एका शेतकऱ्याचे पाने थेट अमेरिकेत पोहोचले आहेत. त्यामुळे या शेतकऱ्याच्या नावाची चांगली चर्चा सुरू झाली आहे.गुलाब महादेव घुले असं या प्रगतशील शेतकऱ्याचे नाव असून तो भोर तालुक्यातील वेळू या गावचा राहणार आहे. आपल्या शेतीच्या बांधावर एक वर्षांपूर्वी केलेल्या पानांच्या रोपांची लागवड आता फायदेशीर ठरत आहे. घुले हे प्रगतशील शेतकरी असून ते शेतीत वेगवेगळे प्रयोग करत असतात. मात्र त्यांच्या पानांना थेट अमेरिकेतून मागणी आली आहे.
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या ओवाळणीवर डल्ला, महिलांचा हिरमोड; योजनेमुळे कोणाचा भरतोय गल्ला?

गुलाब महादेव घुले म्हणाले…

याबाबत माहिती देताना घुले म्हणाले की, शेतीच्या बांधावर लावलेल्या नारळाच्या झाडाच्या बुडाशी पानांच्या रोपांची लागवड एक वर्षांपुर्वी केली होती. त्यानंतर पानाच्या वेलीचे तुकडे करून जीवामृतात बुडवून खड्डात लागवड केल्याने किडी पासून बचाव झाला. सुरुवातीची आठ ते दहा दिवस ठिबक सिंचनाद्वारे या वेलींना दररोज पाणी दिले. दहा ते बारा दिवसांनी या वेलींनी पाने आली. यानंतर दोन ते तीन दिवसांच्या अंतराने वेलींना पाणी दिले.

किडीपासून संरक्षण

या पानांच्या शेतीसाठी विषमुक्त शेतीचे प्रणेते सुभाष पाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जीवामृताचा वापर करून रोपांची वाढ करण्यात आली. रोपांची लागवड केल्यानंतर १५ दिवसांनी नारळाच्या झाडाला ४ फुटांवर तार बांधून पानाचे वेल त्याला बांधले. आठवड्यातून दोन वेळा एक लीटर जीवामृत प्रत्येक रोपास दिले. पानावर पडणाऱ्या किडीपासून संरक्षण करण्यासाठी आठवड्यातून दोन वेळा जीवामृताची पानावर फवारणी केली. या फवारणीमुळे कोणत्याही किडीचा प्रादुर्भाव झाला नाही.

पानांना अमेरिकेत मागणी

खोडापाशी सुकलेला पालापाचोळा, वाळलेल्या काड्या, नारळाच्या शेंड्या, भाताचा कोंडा, काड, पालापाचोळा, गुरांच्या उष्टावळ, वाळलेले निकृष्ट गवत वापरून जमिनीचा पृष्ठभाग झाकल्याने बाष्पिभवनाचा वेग कमी झाला. दिलेले पाणी आणि ओलावा टिकून राहण्यासाठी मदत झाली. तण नियंत्रणात येवून गाडुंळाची संख्या वाढून जमीन भुसभुशीत राहण्यास मदत झाली. पाण्याचा योग्य निचरा झाला. विषमुक्त विड्याची पाने असल्याने २ रुपये प्रति पान बाजार भाव मिळाला. या पानांचीची ऑनलाईन विक्री होते. तसेच शेतावरील बांधावर विक्री होते. विषमुक्त पालेभाज्यांचा बाजार पुण्यात भरविला जातो. या बाजारपेठेत विषमुक्त विड्यांच्या पानांना मागणी जास्त असते. या पानांचा वापर मुखवास आणि तांबूल यासाठी केला जातो. घुले यांच्या पानांना अमेरिकेत मागणी आहे. आतापर्यंत त्यांची पाने मुखवास आणि तांबूल यांच्या माध्यमातून अमेरिकेत पोहोचले आहेत. साधारणता एक हजार ते बाराशे पाने एका वेलीला असल्याने एका वेलीचे अडीच हजार उत्पन्न मिळाले आहे.
Maharashtra Assembly Election Survey: भाजप जागा राखणार, पण शिंदे, दादांना झटका बसणार; सर्व्हे आला, मतदारांचा कौल कोणाला?

कसे तयार होते जीवामृत

शेतावर २ देशी गायीचे सहायाने ३ एकर क्षेत्र पिकवित आहे. देशी गायीपासून गोमूत्र व शेण मिळते. याचा वापर जीवामृत तयार करताना होतो. २०० लीटर पाणी, १० किलो देशी गायीचे शेण, ५ लीटर देशी गायीचे गोमुत्र, १ किलो गुळ, १ किलो बेसन, मुठभर बांधावरची जीवाणू माती हे मिश्रण काठीने मिसळून दिवसातून दोनदा सकाळ व संध्याकाळ काठीने ढवळले. ड्रमच्या तोंडावर गोणपाट झाकून ते ४८ तासांकरता सावलीत ठेवले. आठवड्यातून २ वेळा १ लीटर प्रती रोप दिले. वेलांच्या मुळांना जास्त प्रमाणात जिवामृतदिल्याने वेलीवरील पानांच्या संख्येत व आकारामध्ये वाढ दिसून आली. आतापर्यंत वेलीवर ८ इंच रुंद व ११ इंच लांबीची पाने आली आहेत.

Source link

bhor gulab mahadev ghulegulab mahadev ghule vida leaf farmingpune marathi newsगुलाब महादेव घुले विड्याच्या पानांची शेतीपुणे मराठी बातम्याभोर गुलाब महादेव घुले
Comments (0)
Add Comment