Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the reviews-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the feeds-for-youtube domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the instagram-feed domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121

Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the publisher domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-includes/functions.php on line 6121
स्त्री २ ची तिसऱ्या दिवशी छप्परफाड कमाई, पहिल्याच वीकेंडला गाठला १५० कोटींचा टप्पा - TEJPOLICETIMES

स्त्री २ ची तिसऱ्या दिवशी छप्परफाड कमाई, पहिल्याच वीकेंडला गाठला १५० कोटींचा टप्पा

मुंबई– अमर कौशिकचा हॉरर-कॉमेडी सिनेमा ‘स्त्री २’ रिलीज झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर धिंगाणा घालत असल्याचे पाहायला मिळतेय. अवघ्या ३ दिवसांतच हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आहे. सिनेमाचे बजेट २ दिवसांतच वसूल झाले असून तिसऱ्या दिवशी अधिकच्या कमाईला सुरुवात झाली आहे. आता तर सिनेमाची बजेटच्या तिप्पट कमाई झाली आहे. श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘स्त्री २’ १५ ऑगस्ट रोजी रिलीज झाला. पहिल्याच दिवशी सिनेमाने ५१.८ कोटी रुपयांची जबरदस्त ओपनिंग केली होती आणि आता तिसऱ्या दिवशी ४४ कोटी रुपयांची कमाई करत सर्वांना थक्क केले आहे. या चित्रपटाचे एकूण कलेक्शन किती आहे आणि आतापर्यंत जगभरात किती कमाई केली हे जाणून घेऊ.’स्त्री २’ मध्ये पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी, विजय राज आणि तमन्ना भाटिया यांच्याही प्रमुख भूमिका पाहायला मिळत आहेत. जवळपास ५० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘स्त्री २’ने अवघ्या दोन दिवसांत १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. जगभरातही सिनेमाचे जोरदार वादळ घोंगावत असल्याचे पाहायला मिळते. स्त्री २ ने पहिल्याच दिवशी ‘गदर २’चाही विक्रम मोडला आहे.

Suraj Chavan: बिग बॉसच्या घरात सूरजला मिळाली मायेची बहीण, एका कृत्याने Reel स्टारने दाखवला सुसंस्कृतपणा
Stree २ चे तिसऱ्या दिवसाचे कलेक्शन आणि एकूण कमाई

sacnilk च्या रिपोर्टनुसार, ‘स्त्री २’ ने तिसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी ४४ कोटींची कमाई केली. पहिल्या वीकेंडमध्येच या चित्रपटाने देशभरात १३५.७ कोटींचा व्यवसाय केला आहे. हे अद्याप प्राथमिक आकडे आहेत. पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसरा दिवस कामकाजाचा दिवस असल्याने, चित्रपटाची कमाई ३९.३८% नी घसरली, परंतु तिसऱ्या दिवशी ४०.१३% वाढीसह चांगली कमाई केली.

‘स्त्री २’ ची ऑक्येपेंसी

शनिवारी विकेंडचा पहिला दिवस असल्यामुळे, ‘स्त्री २’ ची एकूण ऑक्यूपेंसी ६१.९६% होती. मॉर्निंग शोमध्ये ते ३५.४७%, दुपारच्या शोमध्ये ६२.१४%, संध्याकाळच्या शोमध्ये ६९.५५% आणि रात्रीच्या शोमध्ये ८०.६९% प्रेक्षकांची संख्या होती.

TMKOC चा वापर अश्लील साइड्सवर करताय तर सावधान! उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, निर्मात्यांचा सुटेकचा श्वास
‘स्त्री २’ चे जगभरातील कलेक्शन

चित्रपटाच्या जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर ‘स्त्री २’ ने ३ दिवसात १५० कोटींचा आकडा पार केला आहे. मात्र, अधिकृत आकडे अद्याप आलेले नाहीत. चित्रपटाचे यश पाहून अनेक बॉलिवूड स्टार्स आणि चित्रपट निर्मात्यांनी दिग्दर्शक अमर कौशिक यांचे कौतुक केले आहे.

‘स्त्री २’ ने रेकॉर्ड तोडले

१५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या सर्व चित्रपटांपैकी ‘स्त्री २’ ने ओपनिंग डेचे रेकॉर्ड तोडले. स्त्री२ ने ‘गदर २’ (४०.१० कोटी), ‘एक था टायगर’ (३२.९३ कोटी), ‘सिंघम रिटर्न्स (३२.१० कोटी), ‘मिशन मंगल’ (२९.१६ कोटी) आणि ‘टायगर ३’ (४४.५ कोटी) यांना मागे टाकले. पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा हा पाचवा भारतीय चित्रपट ठरला आहे. ‘स्त्री २’ सोबतच अक्षय कुमारचा ‘खेल खेल में’ देखील बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला होता, पण तो अद्याप रेस मध्ये पुढे जाऊ शकलेला नाही. मात्र, ‘स्त्री २’मधील अक्षयच्या कॅमिओचे सर्वजण कौतुक करत आहेत. ‘स्त्री २’ हा राजकुमार रावचा सर्वात मोठा ओपनिंग चित्रपट आहे.

Source link

rajkumar rao stree 2shraddha kapoor stree 2stree 2 box office collection day 3stree 2 movieबॉक्स ऑफिस कलेक्शनश्रद्धा कपूरस्त्री २स्त्री २ कास्टस्त्री २ दिग्दर्शकस्त्री २ बॉक्स ऑफिस कलेक्शन
Comments (0)
Add Comment