भरधाव वाहनाने पादचारी महिलेला उडवलं, नंतर आई-लेकाचा चिरडलं; नंदुरबारमध्ये थरारक अपघात

महेश पाटील, नंदुरबार : नंदुरबार शहरातील मिराज सिनेमा ते कोकणी हिल परिसरात रस्त्यानजीक एक भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने रस्त्याच्या कडेला जात असलेल्या एका ६० वर्षीय सायकलस्वाराला उडवलं. सायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने रस्त्यावरून पायी जाणाऱ्या आणखी २ जणांना चिरडलं असल्याची घटना घडली आहे. त्यात एक १२ वर्षाचा मुलगा आणि त्याच्या आईचा समावेश आहे. या दोघांनाही उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्या दोघांचीही प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.वाहन चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा वाहनावरील ताब्यात सुटल्याने हा अपघात घडल्याची माहिती मिळाली आहे. हृदयविकाराच्या झटक्याने वाहन चालकाचा मृत्यू देखील झालेला आहे.
आईचा मृतदेह झाडाला तर लेकाचा मृतदेह नदीत, न्यायाच्या प्रतिक्षेत दोघांना मिठात पुरलं; नंदुरबारमध्ये नेमकं काय घडलं?

न्यायाच्या प्रतिक्षेत दोघांना मिठात पुरलं

दरम्यान, जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी एक धक्कादायक घटना घडली आहे, अक्कलकुवा तालुक्यातील सरी गावाचे शिवारातील घाटात महिलेचा मृतदेह झाडावर लटकलेला दिसला तर मुलाचा मृतदेह नदीत आढळल्याने मोलगी पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान महिलेच्या माहेरच्यांनी घातपाताचा संशय व्यक्त करत गुन्हा दाखल करण्याची मागणीसाठी पोलीस स्टेशन गाठले होते. याबाबत नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात महिला आणि बालकाचे शवविच्छेदन केल्यानंतर सासरच्या मंडळींच्या ताब्यात मृतदेह देण्यात आला.

महिलेच्या माहेरच्यांनी आई आणि मुलाचा मृतदेह दोन दिवसांपासून मिठात पुरून ठेवला आहे. या गुन्ह्याचा तपास करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत आहेत. शवविच्छेदनाचा रिपोर्ट आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल असे पोलिसातर्फे सांगण्यात येत आहे. याबाबत पोलीस काय कारवाई करते याकडे लक्ष लागून आहे.

अक्कलकुवा तालुक्यातील सरीचा टेंबरीगव्हाणपाडा येथे राहणाऱ्या तिज्या इंद्या वसावे यांची मुलगी मोगीबाई चंदू पाडवी हीचे सुमारे १२ वर्षापूर्वी साकली उमरचा लोहारपाडा ता. अक्कलकुवा येथील चंदू धन्या पाडवी याच्याशी लग्न झाले होते. चंदू पाडवी आणि मोगीबाई पाडवी यांना ५ वर्षाचा तनुष नावाचा मुलगा होता.

Source link

accident newscrime newsnandurbar accident newsnandurbar miraz cinema area accidentअपघात बातम्याक्राइम बातम्यानंदुरबार अपघात बातम्यानंदुरबार मिराज सिनेमा परिसर अपघात
Comments (0)
Add Comment