‘ती’ महिला अटल सेतूवर जीव देण्यासाठी गेलीच नव्हती! तपासातून समोर आली चक्रावून टाकणारी माहिती

उरण: अटल सेतूवरुन उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचा जीव पोलिसांनी वाचवला. स्वत:चा जीव धोक्यात घालून महिलेला वाचवणाऱ्या पोलिसांचं सर्वच स्तरातून कौतुक झालं. पण पोलीस चौकशीतून वेगळीच माहिती उघडकीस आली आहे. अटल सेतूवर ज्या महिलेचा जीव वाचवण्यात आला, ती आत्महत्या करण्यासाठी तिथे गेलेलीच नव्हती.

एका अध्यात्मिक गुरुच्या सांगण्यावरुन घरातील देवांचे फोटो विसर्जित करण्यासाठी मुलुंडच्या रहिवासी असलेल्या रीमा पटेल (५६) अटल सेतूवर गेल्या होत्या. रीमा पटेल शुक्रवारी देवांचे फोटो विसर्जित करण्यासाठी निघाल्या होत्या. त्यासाठी त्यांनी कार बुक केली होती. आधी त्यांनी ऐरोलीत फोटो विसर्जित करण्याचा प्रयत्न केला. पण तिथे पाणी खोल नव्हते. त्यामुळे त्या कारनं अटल सेतूवर आल्या.
Kolkata Doctor Murder: डॉक्टर तरुणीला सेक्स रॅकेटचा सुगावा, २ महिन्यांपासून त्रास; कोलकाता प्रकरणात मोठा गौप्यस्फोट
रीमा पटेल यांनी अटल सेतवूर चालकाला कार थांबवण्यास सांगितली. कारमधून उतरुन त्या फोटो समुद्रात विसर्जित करण्यासाठी पुलावरील रेलिंगच्या पलीकडे गेल्या. त्यावेळी त्यांचा तोल गेला. हा प्रकार लक्षात येताच कार चालक संजय यादव त्यांच्या मदतीला धावला. त्यानं रीमा यांचे केस घट्ट धरुन ठेवले. पण त्यांना रीमा यांना वर खेचणं अवघड जात होतं.
Kolkata Doctor Murder: जमाव घुसला, त्यांना सेमिनार हॉल तोडायचा होता; पोलीस हतबल झालेले; नर्सनं सांगितली आँखोदेखी
अटल सेतूवर एक कार थांबल्याची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांची गाडी काही मिनिटांतच तिथे पोहोचली. त्यावेळी रीमा पुलावरुन खाली लटकत होत्या. कार चालकानं त्यांना कसंबसं धरुन ठेवलं होतं. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात येताच पोलीस अंमलदार ललित शिरसाठ, किरण म्हात्रे, यश सोनावणेंनी जीवाची बाजी लावली. ते रेलिंगच्या पलीकडे गेले. त्यांनी रीमा यांना सुरक्षितपणे वर ओढले. वाहतूक पोलिसांनी दाखवलेल्या धाडसामुळे रीमा यांचा जीव थोडक्यात वाचला.

रीमा पटेल यांची पोलिसांनी चौकशी केली. त्यांना अटल सेतूवर कार थांबवण्यामागचं कारण विचारलं. त्यावर देवदेवतांचे फोटो विसर्जित करण्यासाठी काप पुलावर थांबवली होती. पण फोटो विसर्जित करताना माझा तोल गेला, अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली. न्हावा-शेवा बंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांनी ही माहिती माध्यमांना सांगितली.

Source link

atal setuatal setu suicideWomen on Atal SetuWomen tries to jump from Atal Setuअटल सेतूअटल सेतूवर उडी मारण्याचा प्रयत्नअटल सेतूवरुन आत्महत्येचा प्रयत्नअटल सेतूवरुन महिलेची उडी
Comments (0)
Add Comment