जरांगेंची लढण्याची हैसियत नाही, शरद पवार उठसूट शाहू फुलेंचे नाव घेतात; लक्ष्मण हाके संतापले

नांदेड, अर्जुन राठोड : महाराष्ट्र कोणाच्या बापाची मक्तेदारी नाही आणि कोणाच्या जहागीर नाही, आम्ही ठरवलं तर सरपंच पण होऊ देणार नाही, त्यामुळे ओबीसीचे उमेदवार देणाऱ्यांनाच आम्ही यापुढे मतदान देऊ आणि त्यांना निवडून आणू , अन्यथा आमचे उमेदवार उभे करू असा इशारा ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी राजकर्त्यांना दिला आहे. रविवारी जिल्हातील भोकर शहरात ओबीसी आरक्षण बचाव मेळावा पार पडला, यावेळी हाकेंनी सरकारला इशारा दिला. आपल्या भाषणा दरम्यान हाके यांनी शरद पवार आणि जरांगे पाटलांवर देखील तोफ देखील डागली.

काय म्हणाले लक्ष्मण हाके?

मराठा समाजाला एडब्लूएस मध्ये आरक्षण देण्यात आले, मात्र त्यांनी ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी तगादा लावत आहेत. १९९४ ला आरक्षण मिळाले. २००४ ला शासनाने जीआर काढला आणि ओबीसीच आरक्षण धोक्यात आल्याचे हाके म्हणाले. आजपर्यंत ओबीसीला काहीचा भेटलं नाही. त्यांचेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हा परिषद अध्यक्ष महापौर, सरपंच त्यांचेच झालेत. ओबीसी बद्दल बोलणाऱ्या छगन भुजबळाचा आवाज दाबून टाकला जातोय. लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाने पंकजा मुंडे, चंद्रकांत खैरे यांना पाडले. तेव्हा यावरून आपल्याला यापुढे सावध राहायला पाहिजे. आम्ही ठरवलं सरपंच पण निवडून येणार नाही असा इशारा प्रा.लक्ष्मण हाके यांनी दिला आहे. १९३१ च्या जातीय जणगननेनुसार देशात ओबीसीची संख्या ६० टक्के आहे, निधी मात्र एक ते दोन टक्के मिळत असल्याची खंत हाकेंनी बोलून दाखवली.

लक्ष्मण हाके पुढे म्हणाले, गेल्या दोन ते तीन वर्षाच्या काळात ओबीसीचे आरक्षण चॅलेंज होत असताना महाराष्ट्रातील एक दोन आमदार मंत्री सोडले तर एकाने ही सामाजिक न्याय हक्काच्या आरक्षणा बद्दल विधानसभेत आणि ओबीसी आंदोलनाबाबत बोलले नाहीत. आम्ही चार पिढ्यांना आमदार खासदार केले. एकही नेता ओबीसीच्या बाजूने नाहीत, त्यामुळे जो पक्ष ओबीसीचे सर्वात जास्त उमेदवार देणार आणि ओबीसीच्या बाजूने राहील त्यांनाच निवडून आणणार असे प्रा. लक्ष्मण हाके म्हणाले. कोणत्याही पक्षाने ओबीसीचे जास्त उमेदवार दिले नाही तर ओबीसीचे उमेदवार उभे करणार आणि ओबीसींच्या हक्काची भाषा करणारे उमेदवार विधानसभेत पाठवणार असेही हाके यांनी पुढे जाहीर केले.
Chhagan Bhujbal: हिंमत असेल, तर निवडणूक लढवा; छगन भुजबळांचे मनोज जरांगेंना खुलं चॅलेंज

तर शरद पवार पंतप्रधान झाले असते

शरद पवार हे नेहमी फुले शाहू यांचे उठसूट नाव घेत असतात. तुमच्या घरात किती आमदार खासदार आहेत याचं उत्तर त्यांनी द्यावं. शरद पवार यांना ओबीसीचे अंतःकरण कळले असते तर पवार चारवेळा देशाचे पंतप्रधान झाले असते असे विधान ओबीसीचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके म्हणाले. देशात लढायचे सोडून तुम्ही अठरा पगड जातीच्या आरक्षणात का घुसताय? असा सवाल हाके यांनी उपस्थित केला. सात आठ महिने झाले तुम्ही ओबीसीच्या आरक्षणावर ब्र काढला नाही, लोकसभा निवडणुकीत तुम्ही पोळी भाजून घेतली. जर ओबीसीच्या व्यक्तीला निवडणुकीत उपद्रव मूल्य दाखवता येत नसेल तर याचे आरक्षण तुम्ही काढून घेणार का? असा सवाल हाके यांनी उपस्थित केला.

मनोज जरांगे यांची हैसियत नाही

मनोज जरांगे हे अजिबात निवडणुका लढणार नाहीत, लोकसभेप्रमाणे कुणाला तरी पाठिंबा देतील असे प्राध्यापक लक्ष्मण हाके म्हणाले. निवडणुका १२ कोटी जनतेच्या हिताच्या आणि विचारावर लढल्या जातात. जरांगे यांची हैसियत नाही त्यामुळे जरांगेंनी काहीही बोलू नये असे हाके म्हणाले.

Source link

laxman hake on manoj jarangelaxman hake on sharad pawarreservation systemओबीसी आरक्षणप्राध्यापक लक्ष्मण हाकेमनोज जरांगेमराठा आरक्षणशरद पवार
Comments (0)
Add Comment