भाजप जागा राखणार, पण शिंदे, दादांना झटका बसणार; सर्व्हे आला, मतदारांचा कौल कोणाला?

मुंबई: लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर सत्ताधारी महायुती सरकारनं विधानसभेसाठी कंबर कसली आहे. विधानसभा निवडणूक दिवाळीनंतर होण्याची दाट शक्यता आहे. या निवडणुकीत पुन्हा एकदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होईल. लोकसभेतील पराभवानंतर महायुतीनं लाडकी बहिणसारख्या योजना आणत विधानसभेसाठी मतांची पेरणी सुरु केली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मॅट्रिझनं केलेल्या सर्वेक्षणातून महत्त्वाचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत.

मॅट्रिझच्या ताज्या सर्व्हेनुसार, विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरु शकतो. २०१४, २०१९ नंतर पुन्हा एकदा भाजपला विधानसभेत राज्यात सर्वाधिक जागा मिळण्याचा अंदाज आहे. मतांच्या टक्केवारीचा विचार केल्यास सर्वाधिक २५.८ टक्के मतदान भाजपला होईल. त्यानंतर १८.६ टक्के मतदानासह काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर असेल. यानंतर ठाकरेसेनेला १७.६ टक्के, तर शिंदेसेनेला १४.२ टक्के मतदान होण्याचा अंदाज आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना १० टक्क्यांच्या खाली मतं मिळतील असा कयास आहे. अजित पवार गटाला ५.२ टक्के, तर शरद पवार गटाला ६.२ टक्के मतं मिळण्याचा अंदाज आहे.
Uddhav Thackeray: ज्याच्या जास्त जागा, त्याचा CM; ठाकरेंनी मविआच्या सभेत सांगितला सुत्रातील गंभीर धोका
राज्याच्या राजकारणात यंदा प्रथमच सहा मोठे राजकीय पक्ष विधानसभेच्या रिंगणात पाहायला मिळतील. लोकसभेला अनेक जागांवर अतिशय अटीतटीच्या लढती झाल्या. विधानसभेलादेखील त्याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. तब्बल ४२ जागांवर अटीतटीचे सामने होतील असा अंदाज आहे. याचा अर्थ जवळपास १४ टक्के जागांवर अतिशय घासून निवडणूक होईल. राज्यात विधानसभेच्या एकूण २८८ जागा आहेत. बहुमतासाठी १४५ जागा गरजेच्या आहेत.

महायुतीचा विचार केल्यास भाजप पुन्हा एकदा मोठा भाऊ ठरण्याची दाट शक्यता आहे. भाजपला ९५ ते १०५ जागा मिळतील असा अंदाज आहे. तर शिंदेसेनेला १९ ते २४ आणि अजित पवार गटाला ७ ते १२ जागा मिळण्याचा कयास आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरु शकतो. त्यांना ४२ ते ४७ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर ठाकरेसेनेला २६ ते ३१, तर शरद पवार गटाला २३ ते २८ जागा मिळण्याची शक्यता आहे. अन्य पक्षांना ११ ते १६ जागांवर यश मिळू शकतं.

Source link

Maharashtra Assembly Election pre poll surveyMaharashtra Assembly Election SurveyMaharashtra politicsSharad PawarUddhav Thackerayअजित पवार गटभाजप मोठा पक्षमहाराष्ट्र राजकीय बातम्यामहाराष्ट्र विधानसभा निवडणूकशिवसेना
Comments (0)
Add Comment