नोकरीसाठी मुलाखतीला गेला, उद्यापासून रुजू होणार होता, पण…
शंतनु शिवाजी गाडेकर (वय २४ राहणार ११ गजानन नगर) असे अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे. शंतनु हा गजानन नगरमध्ये कुटुंबीयांसोबत राहतो. त्याच्या वडिलांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले ते एका खाजगी कंपनीमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करत होते. शंतनू हा नुकताच बीबीए शाखेतून पदवी घेतली आहे. पदवी पूर्ण झाल्यामुळे शंतनू शनिवारी वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये एका नामांकित कंपनीत मुलाखत देण्यासाठी गेला होता. मुलाखतीनंतर त्याची कंपनीने निवड केली होती. त्याला दुसऱ्या दिवशी रुजू होण्यासंदर्भात कंपनीने पत्र दिलं होतं.
मित्रांना फोन करुन नोकरी लागल्याची बातमी दिली
मुलाखत दिल्यानंतर शंतनुने ही बाब आपल्या मित्रांना फोनवरून कळवली होती. शंतनु वाळुज औद्योगिक वसाहतीतून घराकडे परतत असताना नगर रोडवरील लक्ष्मी माता मंदिरासमोर त्याच्या दुचाकीचा दुभाजकाला धडकून अपघात झाला. या अपघातामध्ये तो गंभीर जखमी झाला होता त्याला नागरिकांनी तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले. एवढी डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यामध्ये अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास संगीता दराडे करीत आहेत.
लेकाचा मृत्यू झाल्याचं कळलं अन् कुटुंबाचा मन पिळवटून टाकणारा आक्रोश
दोन वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झालं होतं. त्यानंतर शंतनू याचं निधन झाल्याची बातमी कळताच नातेवाईकांनी घाटी रुग्णालयामध्ये हंबरडा फोडला. तर, घटनेची माहिती परिसरताच नागरिकांनी देखील हळूहळू व्यक्त केली शंतनू याच्या पश्चात आई आणि् भाऊ असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे.