दीदीसोबत धरणावर, ३ वर्षांची बहीण पाय घसरुन पाण्यात, तिला वाचवायला गेले अन् चौघे बुडाले

म. टा. प्रतिनिधी, जळगाव: चाळीसगाव तालुक्यातील पिंपरखेड गाव परिसरातील केटी वेअर धरण परिसरात खेळायला गेलेल्या चार सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान घडली. रोशनी सुभाषसिंग आर्य (वय ९), शिवांजली सुभाषसिंग आर्य (८), आर्यन सुभाषसिंग आर्य (३) आराध्या सुभाषसिंग आर्य (४, सर्व रा. दुगणी तहसील, ता. सेंधवा, जिल्हा बडवणी) अशी बुडालेल्या भावंडांची नावे आहेत.

चाळीसगाव तालुक्यातील पिंपरखेड गावात आदिवासी समाजाचे आर्य परिवार मजुरीसाठी उदय अहिरे यांच्याकडे आला आहे. कुटुंबात पाच मुली व एक मुलगा आहेत. नऊ वर्षांची मोठी मुलगी रोशनी आर्य भांडी घासण्यासाठी धरणाच्या काठावर गेली असता तिच्यासोबत शिवांजली, आर्यन, आराध्या ही तीन भावंडेही होती. धरणाच्या पाण्याजवळ बहिणीचा पाय घसरून पाण्यात बुडाली. तिला वाचवण्याचा प्रयत्न करता इतर तिन्ही भावंडे पाण्यात पडली. मात्र, पोहता येत नसल्याने चौघांचा बुडून मृत्यू झाला. ग्रामस्थांनी चौघांचे मृतदेह बाहेर काढले. या घटनेने आर्य कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येलाच चार भावंडांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.
Accident News: बड्या कंपनीत नोकरी, उद्यापासून रुजू होणार, मित्रांना फोन; पण नियतीने घात केला अन् कुटुंबाचा आधार गेला

कसारा घाटात पाच जणांचा मृत्यू

नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या महामार्गावर नवीन कसारा घाटातील बलगर पॉइंटजवळ रविवारी दुपारी दूध टँकर तीनशे फूट दरीत कोसळून चालकासह पाच जण ठार झाले, तर चार जण जखमी झाले. मृतांमध्ये विजय घुगे (वय ६०), आरती जायभावे (३१), सार्थक वाघ (२०), चालक योगेश आढाव (५०), रामदास दराडे (५०) यांचा समावेश आहे. टँकरचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. महामार्गावरील रूट पॅट्रोलिंग टीम, आपत्ती व्यवस्थापन टीम, तसेच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

मात्र, मुसळधार पावसामुळे मदतकार्यात अडथळा येत आहे. महामार्ग पोलिस आणि महामार्ग प्राधिकरणाचे समीर चौधरी, सूरज आव्हाड, सचिन भडांगे, शिवा कातोरे देविदास म्हसणे, संदीप म्हसणे आणि रुग्णवाहीका टीमने दोरीच्या साह्याने दरीत उतरून चार गंभीर जखमींना बाहेर काढले. अद्याप तीन ते चार जण अडकले असल्याचा अंदाज आहे.

Source link

chalisgaon before rakshabandhanJalgaonjalgaon siblings drownrakshabandhan 2024जळगाव चार भावंड बुडालीजळगावात चिमुकले बुडालेभाऊ-बहिणींचा मृत्यूरक्षाबंधनापूर्वी चार भावंड बुडाली
Comments (0)
Add Comment