हात-पाय दाबायला नकार, मग तो बापाच्या छातीवर बसला अन्… नागपुरात हादरवणारी घटना

म. टा. प्रतिनिधी, नागपूर: हातपाय दाबण्यास मनाई केल्याने कुख्यात इंगाने मारहाण करून वडिलाचा खून केला. ही थरारक घटना कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नबाबपुरा येथील करण अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक एकमध्ये घडली. दत्तात्रय बाळकृष्ण शेंडे (वय ६२) असे मृतकाचे नाव आहे. कोतवाली पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून मारेकरी इंगा ऊर्फ कुशल ऊर्फ खुशाल दत्तात्रय शेंडे (वय ३३) याला अटक केली. इंगा हा कुख्यात गुन्हेगार आहे. तो गँगस्टर संतोष आंबेकर याचा भाचा शैलेश केदार (वय ३८) याचा ‘राइट हॅण्ड’ मानला जातो.

इंगा हा वडील, भाऊ प्रणव (वय ३५) व चुलतभाऊ चैतन्य ऊर्फ गणू अनिल शेंडे (वय २३) याच्यासोबत राहतो. शनिवारी दुपारपासूनच तो दत्तात्रय यांना मारहाण करायला लागला. दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास इंगाने दत्तात्रय यांना हातपाय दाबायला लावले. दत्तात्रय यांनी नकार दिला. इंगा हा दत्तात्रय यांच्या छातीवर बसला. त्याने बुक्क्यांनी दत्तात्रय यांना मारहाण केली. ते बेशुद्ध झाले. इंगा पसार झाला.

प्रणव आणि चैतन्य या दोघांना दत्तात्रय यांना मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. मेयो प्रशासनाने तहसील पोलिसांना माहिती दिली. घटना कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने तहसील पोलिसांनी कोतवाली पोलिसांना कळविले. कोतवाली पोलिसांचा ताफा घटनास्थळी गेला. प्रकरणाची माहिती घेतली. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून इंगाला अटक केली.

काही दिवसांपूर्वीच तुरुंगातून बाहेर आलेला

ऑगस्ट २०१८मध्ये व्यापारी ऋषी अशोक खन्ना (वय ३४, रा. जागनाथ बुधवारी) याने शैलेशकडून दहा टक्के व्याजदराने ३० हजार रुपये घेतले. दहा महिन्यांपर्यंत ऋषीने त्याला दर महिन्याला तीन हजार रुपये व्याज दिले दिले. यादरम्यान शैलेशने सीए अविनाश जोहरापूरकर यांना २५ लाखांची खंडणी मागितली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून शैलेशला अटक केली. तो कारागृहात गेला. त्यामुळे ऋषीने त्याला पैसे देणे बंद केले. शैलेश हा जामिनावर कारागृहातून बाहेर आला. ऋषीने त्याला पूर्ण पैसे दिले. पैसे घेतल्यानंतरही शैलेशने पैशासाठी ऋषीला त्रास देणे सुरू केले.

जून महिन्यात शैलेश व इंगाने ऋषीला इतवारीतील सलूनमध्ये गाठले. ऋषीला मारहाण करून ३० हजार रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास ठार मारण्याची धमकी दिली. ऋषीने तहसील पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून शैलेश व इंगाला अटक केली. ते न्यायालयीन कोठडीअंतर्गत कारागृहात होते. काही दिवसांपूर्वीच या प्रकरणात शैलेश व इंगा कारागृहातून बाहेर आले.

Source link

ajchya batmyacrime news todaynagpur crime newsnagpur today newsson killed father in nagpurनागपुरात वडिलांची हत्यानागपूर क्राइम न्यूजनागपूर बातम्यानागपूर बापाची हत्या
Comments (0)
Add Comment