Mumbai News: काळा घोडा परिसर होणार वाहनमुक्त; ‘या’ पाच रस्त्यांना मिळणार हेरिटेज दर्जा

मुंबई : काळा घोडा परिसरातील पाच रस्ते लवकरच वाहनमुक्त होणार आहेत. या रस्त्यांना हेरिटेज दर्जा देण्यासाठी महापालिका सात कोटी रुपये खर्च करणार आहे. हे काम सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात शनिवारी व रविवारी या परिसरात वाहनांच्या गर्दीशिवाय हेरिटेज वॉकचा आनंद घेता येईल.फेब्रुवारी, २०२४मध्ये पालिकेने काळा घोडा परिसरातील साईबाबा रोड, रोप वॉक लेन, फोर्ब्स स्ट्रीट, रुदरफिल्ड स्ट्रीट आणि बी भरुचा रोड या पाच रस्त्यांना पादचारी विभागात रूपांतरित करण्याची योजना आणली. या रस्त्यांवर कोबेस्टोन फरसबंदी केली जाईल. तसेच हेरिटेज स्ट्रीट फर्निचर, हेरिटेज मॅनहोल आणि जलवाहिन्या, मलनिःसारण वाहिन्या उभारण्यात येतील. रस्‍त्‍यांवर वाहनांना अटकाव करणारे हायड्रोलिक बोलार्डचे अडथळे उभे केले जाणार आहेत. यासह या रस्त्यांवरून चालण्यासाठी आवश्यक त्या सुविधा देण्याचा प्रयत्न करू, असे पालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले.

Pune Shanivarwada: शनिवारवाडा दत्तक देणे आहे! पुण्यातील ‘ही’ पाच वारसास्थळे दत्तक घेता येणार, कोणाला संधी मिळेल?
यामध्ये भिंतींचे रंगकाम, लँडस्केपिंग आणि रोषणाईच्या कामांचाही समावेश आहे. पहिल्या टप्प्यात हे रस्ते आठवड्याच्या शेवटी वाहनमुक्त असतील. या रस्त्यांना कला मार्ग म्हणून वर्षभर विकसित करण्याची परवानगी देण्याचा विचार आहे. या भागातील माजी नगरसेवक ॲड. मकरंद नार्वेकर यांनी या नवीन संकल्पनेला रहिवासी व अभ्यागत यांच्याकडून पाठिंबा मिळावा यासाठी आधी प्रायोगिक तत्त्वावर वाहनमुक्त क्षेत्र योजना राबवली जाईल. नवीन फुटपाथ, पेंटिंग्ज आणि लाइट व बेंचसह जागा निश्चित केल्या जाणार आहेत, असे सांगितले.

कला परिसर लक्षात घेऊन पावले

‘याठिकाणी जवळपासच्या रेस्टॉरंटमधून खाद्यपदार्थ मागवून पर्यटक जेवणाचा आनंद घेऊ शकतील. परिसरात अभ्यागतांसाठी पुरेशी पार्किंगची जागा देखील पुरवली जाईल, प्रतिबंधित क्षेत्रात वाहनांची वेगमर्यादा २० किमी प्रतितास पेक्षा जास्त नसेल’, असे नार्वेकर यांनी नमूद केले.

Source link

BMCforbs streetheritage sitesHydraulic Bollardkala ghodaRope Walk LaneRutherfield Streetमुंबई बातम्यामुंबई महानगरपालिका
Comments (0)
Add Comment