शरद पवार पुणे दौऱ्यावर आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी अजित पवारांच्या बारामतीतील लढण्याच्या विषयावरही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, त्यांना आपला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. त्यांना जिथे अनुकूल वातावरण असेल तिथे ते लढतील, आका त्यांच्या मनात नक्की काय हे मला माहिती नाही. पुढे त्यांना संभाजी भिंडेंबद्दल विचारले असता त्यांनी पत्रकारांनाच झापले.
संभाजी भिडेंवर प्रश्न विचारताच शरद पवार म्हणाले…
संभाजी भिंडेंबद्दल प्रश्न विचारताच शरद पवारांनी पत्रकारांनाच झापले आणि प्रश्नावर नाराजी व्यक्त केली. ‘संभाजी भिडे वगैरे काय प्रतिक्रिया देण्याच्या लायकीची माणसं आहेत का? काहीही प्रश्न विचारायचे का? हल्ली कसेही प्रश्न विचारता. एकंदरित दर्जा फार उतरलेला आहे. संभाजी भिडे आणि अमुक-तमुक..’ अशा शब्दांत शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली.
संभाजी भिंडेंचं वक्तव्य काय?
संभाजी भिडे यांनी पत्रकार परिषद घेत राज्यात तापलेल्या मराठा आरक्षणावर आपली भूमिका मांडताना आरक्षणाची मागणी करणाऱ्यांना सुनावले. ते म्हणाले, मराठा म्हणजे वाघ-सिंह आहेत. संपूर्ण जंगल तुमचे आहे. असे असताना मराठ्यांनी आरक्षण का मागावे? सांगलीतील कमांडो ट्रेनिंग कॅम्पचा उल्लेख करत या ट्रेनिंग कॅम्पमध्ये निःशुल्क प्रवेश दिला तरी वाघ-सिंहांनी तिथे प्रवेश घ्यावा का? विमान उडविण्याच्या प्रशिक्षणासाठी गरुडाने प्रवेश घ्यावा का? स्विमिंग क्लबमध्ये माश्याने प्रवेश घ्यावा का? याच न्यायाने मराठ्यांनी आरक्षण मागावं का? सबंध देशाचा संसार चालवणारी मराठ्यांची जात आहे. मराठ्यांना उभा देश चालवायचा आहे. आरक्षण कुठं घेऊन बसलात?