Rajesh Padvi : मला बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय, आमदार राजेश पाडवी भाजपमध्येच राहणार

महेश पाटील,नंदुरबार : शहादा- तळोदा विधानसभेचे भाजपा आमदार राजेश पाडवी भाजपा सोडण्याच्या वाटेवर असून इतर पक्षाच्या संपर्कात असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून विधानसभा क्षेत्रासह जिल्ह्यात सुरू होती. या चर्चांना आमदार राजेश पाडवी यांनी पूर्णविराम दिला असून कुठेही जाऊन राजकीय बदल करण्याच्या मानसिकतेमध्ये अथवा कोणताही अन्य पक्षाच्या किंवा पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात मी नाही असे स्पष्ट करत याबाबतचे प्रसिद्धीपत्रक त्यांनी काढले आहे.

बदमान करण्याचा प्रयत्न होतोय

आमदार राजेश पाडवी यांच्या पक्ष बदलाच्या चर्चा राजकीय पटलावर आणून पक्षात बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे असा आरोप करण्यात आला आहे तसेच त्या संदर्भातील आमदार कार्यालयाकडून प्रेस नोट प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ”माझ्या सामाजिक व राजकीय जन्म भारतीय जनता पक्षात झाला असून परिसरामध्ये विकासाची नांदी करण्याचे ध्येय घेऊन नियमित प्रेरित होतो.प्रशासकीय अधिकारी असताना नेहमीच सामाजिक कार्याच्या माध्यमातून बदल घडविण्यासाठी राजकीय शक्तिंसोबत असावे लागते. म्हणून भारतीय जनता पक्षाची राष्ट्राप्रती, विश्वाप्रती असणारी सखोल विचारधारा मला नेहमीच आवडत राहिली आहे.म्हणून मी देव,देश,धर्माच्या कार्यासाठी या विचारधारेचा पूर्वीपासून अनुयायी आहे व यापुढे देखील याच प्रमाणे नियमित राहील यात तीळ मात्र शंका नाही”.असं आमदार राजेश पाडवी यांनी म्हटलं आहे.
Devendra Fadnavis : मी थेट राजीनामा देईन, जरांगे पाटलांच्या आरोपांना देवेंद्र फडणवीसांचे उत्तर

मी अन्य पक्षांच्या संपर्कात नाही

ते पुढे म्हणाले की, ”मागील काही दिवसांपासून अन्य विचारधारेच्या पक्षाच्या संपर्कात आहे असे खोटे वातावरण विरोधकांच्या वतीने तयार करण्यात येत आहे. परंतु मी ठरवलेल्या विकासाचा दृष्टिकोन मला स्पष्टपणे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून दिसतो या शासनाने जनतेसाठी केलेले धोरण कल्याणकारी आहे व मी त्याबाबत पूर्णपणे सहमत असल्यामुळे कुठेही जाऊन राजकीय बदल करण्याच्या मानसिकतेमध्ये अथवा कोणताही अन्य पक्षाच्या किंवा पदाधिकाऱ्यांच्या मी संपर्कात नाही.यामुळे कोणीही कोणत्याही अफवांना बळी पडण्याचे काहीही कारण नाही असे मला स्पष्टपणे सांगावेसे वाटते.माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पक्षाने प्रशासकीय सेवेतून एका मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली, विविध राज्यांच्या निवडणुकांमध्ये प्रभारी केले पक्षाने माझ्यावर प्रचंड विश्वास दाखवला मी त्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे”. अशी भूमिका राजेश पाडवी यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून मांडली आहे.

Source link

bjp mla rajesh padvirajesh padviRajesh Padvi newsनंदुरबार बातमीराजेश पाडवीराजेश पाडवी बातमी
Comments (0)
Add Comment