शेतात वीज कोसळली, वडिलांनी लेकाला खांद्यावर घेत रुग्णालय गाठलं पण… २२ वर्षीय तरुणाचा अंत

जळगाव : शेतात खुरपणी करण्यासाठी गेलेल्या तरुणावर वीज कोसळून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र मुलगा वाचेल या आशेने त्याच्या वडिलांनी पोटच्या लेकाला आरोग्य केंद्रात घेऊन जाण्यासाठी रस्ता नसल्याने दोन किलोमीटर खांद्यावर उचलून त्यांनी रुग्णालय गाठलं. मुक्ताईनगर तालुक्यातील पिंप्राळा येथील ईश्वर शांताराम सुशील (वय २२), राहणार पिंपळा तालुका मुक्तानगर हा तरुण शेतात खुरपणी करण्याचं काम करत होता. तेवढ्यात त्याच्या अंगावर वीज कोसळली. मात्र मुलगा वाचेल या आशेने बापाने मुलाला दोन किलोमीटर खांद्यावर पायपीट करत रुग्णालय गाठलं, मात्र तरुणाचा मृत्यू झाला होता. बापाची ही पायपीट अखेर अपयशी ठरली.

वीज कोसळली आणि अनर्थ घडला

ईश्वर हा पिंप्राळा शहरातील शेतात आई-वडील आणि मोठ्या भावासोबत रविवारी खुरपणी करण्यासाठी गेला होता. दुपारी अचानक सोसाट्याचा वारा सुरू झाला आणि काही वेळातच विजांच्या कडकडाटसह जोरदार वारा सुरू झाला. जोरदार पाऊस सुरू झाल्यामुळे सगळ्यांनी घरी येण्याचा निर्णय घेतला.
Sindhudurg News : आचरा समुद्रात मासेमारीसाठी गेले, अचानक बोटीत पाणी शिरू लागलं आणि…नारळी पोर्णिमेच्या दिवशी गावावर शोककळा
ईश्वर हा थोडा पुढे निघाला असता त्याच्या बाजूलाच वीज कोसळली. त्यात त्याचे पाय बांधले गेले आणि तो जमिनीवर कोसळला. हा प्रकार शेतातून परत येत असलेल्या बाळू घाईत यांना दिसला. त्यांनी ईश्वराचा मोठा भाऊ विशाल, सुशील यांना आवाज दिला. विशाल धावतच जमिनीवर पडलेल्या लहान भावाकडे आला. ईश्वरला पाहून त्याने हंबरडा फोडला, तेवढ्यात ईश्वरचे आई-वडील सुद्धा घटनास्थळी धावले. काही वेळा पूर्वी सोबत काम करत असलेल्या ईश्वरला जमिनीवर पडलेले पाहून आई-वडील आणि भावाने एकच आक्रोश केला.

पित्याने मुलाचा मृतदेह पाठीवर आणला

शेतात जाण्यासाठी पक्का रस्सा नसल्याने आणि कोणत्याही वाहनाची सोय नसल्याने मृत ईश्वर याचे वडील शांताराम सुशिर यांनी आपल्या २२ वर्षीय मुलाचा मृतदेह पाठीवर घेतला आणि सुमारे दोन किलोमीटर पायी चालत गावापर्यंत आणला. त्यानंतर त्याला कुऱ्हा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रा दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

Source link

jalgaon newsman died lightning in jalgaonजळगाव बातमीजळगाव मुक्ताईनगर पिंप्राळा वीज कोसळून मृत्यूजळगाव वीज कोसळून मुलाचा मृत्यू
Comments (0)
Add Comment