सतत उपोषण करुनही दुर्लक्ष, तरुणाला रस्त्यावरच फिट आली, परिस्थिती सांगून पत्नी ढसाढसा रडली

अभिजित दराडे, पुणे : गेल्या १२ दिवसांपासून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात उपोषण करत असलेल्या तरुणाला अचानक फिट आली. फिट आल्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. रोहित आर्या असे या तरुणाचे नाव आहे. माझी शाळा, सुंदर शाळा या प्रकल्पाचे डिझाईन या तरुणाने केल्याचा दावा त्याने केला होता, मात्र त्यांची दखल घेतली नसल्याने त्यांनी सरकारच्या विरोधात आंदोलन केले होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी सूरज लोखंडे आणि संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे हे देखील या ठिकाणी उपस्थितीत होते

‘मला अडकवण्याचा प्रयत्न’

३ ऑगस्ट रोजी रात्री दीपक केसरकर यांनी घरी येऊ माझ्या अपेक्षा जाणल्या, चुकीचं नसल्याचे सांगितले आणि सोमवारी (५ ऑगस्ट) ला सर्व ठीक करण्याचे आश्वासन देत मला उपोषण सोडायला सांगितले. त्यांचा मान मी राखला. ७ ऑगस्टला मंत्री महोदयांचे आश्वासन पोकळ असल्याचे उघड झाले. ९ ऑगस्टला मंत्री महोदयांसोबत पुन्हा भेट झाली, ते परत व्यवस्थित करण्याचे आश्वासन देत होते, परंतु शालेय शिक्षण विभाग सह सचिव महाजन यांनी माझी एक चूक झाली असून त्याची चौकशी झाल्याशिवाय काही करता येणार नसल्याचे सांगितले. माझ्याबाबतीत अनेक खोट्या गोष्टी सांगितल्या जात होत्याच, आता मला अडकवण्याचं प्रयोजन सुरु आहे. मला काही झाले तरी कोणतेही उपचार करू नये. माझ्या अपेक्षा सध्या आहेत, पूर्ण झाल्याशिवाय मला उपोषण सोडायचे नाही, असं उपोषण करणाऱ्या तरुणाने म्हटले आहे.
Mumbai goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग आंदोलन तीव्र, सामान्यांचा जनक्षोभ होण्याचा इशारा; मुख्यमंत्र्यांचीही भेट घेणार
याबाबत बोलताना तरुणाने सांगितलं, की फिल्म लेट्स चेंजच्या आधारावर या अभियानाची संकल्पना करून २०२२ पासून मी PLC स्वच्छता मॉनिटर राबवत आहे. माझी संकल्पना आणि मी घेतलेले फिल्म राईट्स वापरले गेले. परंतु माझ्याकडून पूर्ण काम करून घेतल्यानंतर मी कुठेच नव्हतो. शासन त्यांच्या चुका सुधारेल का? मीडिया दखल घेऊन लोकं जागे होतील का? असा सवाल त्याने केला.

‘माझ्या प्रोजेक्टसाठी पैसे तसंच नावही दिलं नाही’

मी आत्महत्या केली असं समजून, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, त्यांचे PS मंगेश शिंदे, आयुक्त सुरज मांढरे, समीर सावंत आणि तुषार महाजन हे जबाबदार असल्याचं तरुणाने म्हटलं आहे.

आंदोलन करुन एक महिना झाला. मंत्री महोदयांनी आश्वासन दिले मात्र त्यांनी काहीच केलं नाही. मी केलेला प्रकल्प हा केसरकर साहेबांना आवडला होता आणि त्यांनी माझी शाळा सुंदर शाळामध्ये तो घेतला आणि २ कोटी रुपये मंजूर केले, पण यानंतर त्यांनी पैसे नाही दिले, नावही दिले नाही, असा आरोपही तरुणाने केला आहे.

Source link

deepak kesarkar newsPunePune newspune rohit arya hunger strikeदीपक केसरकरपुणे बातमीपुणे रोहित आर्या उपोषण आंदोलनमाझी शाळा सुंदर शाळा प्रकल्पाचे डिझाईन
Comments (0)
Add Comment