कोल्हापूर : महिनाभरापूर्वी कागल येथील गोरंबे मठातील मठाधिपतींचं निधन झालं होतं. त्यांच्या निधनानंतर विरह सहन न झाल्याने साधनेसाठी राहत असलेल्या दोन साधकांनी १४ ऑगस्ट रोजी आपलं जीवन संपवलं. आंबा (ता. शाहूवाडी) येथील सड्यावरून दरीत उड्या टाकून दोघांनी आपली जीवन यात्रा संपवली. स्वरूप दिनकर माने (रा. कवठेपिरान, ता. मिरज, जि. सांगली) आणि प्रशांत श्रीरंग सातवेकर (वय १९, रा. अर्जुनवाडा, ता. कागल) अशी या साधकांची नावं आहेत. दरम्यान रविवारी आंबा आणि देवरूख येथील मदत पथकाने सहा तासांची मोहिम राबवून दुपारी दोघांचे मृतदेह पाचशे फूट दरीतून बाहेर काढले.
मिळालेल्या माहितीनुसार, १४ ऑगस्ट रोजी कागल पोलीस ठाण्यात गोरंबे मठातील स्वरूप आणि प्रशांत हे दोन तरुण बेपत्ता असल्याची नोंद झाली होती. ते अडीच वर्षांपासून गोरंबे मठात साधनेसाठी राहत होते. येथील मठाधिपती यांचा महिन्यापूर्वी मृत्यू झाला होता. अनेक वेळा समजावून देखील मठाधिपती गेल्याच्या विरहातून दोघे ही बाहेर पडत नव्हते. अखेर १४ ऑगस्ट रोजी दोघांनी थिमेट खाऊन रेनकोटसह आंबा (ता.शाहूवाडी) येथील सड्यावरून दरीत उड्या टाकून आपली जीवन यात्रा संपवली होती.
सुशांतचे बीएससी पर्यंतचं शिक्षण झालं होतं. त्याचे वडील निपाणी औद्योगिक वसाहतीत हातमाग आहेत. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ आहे. तर स्वरूप डी. फॉर्मसी झाला होता. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.
दरम्यान वन विभागाचे कर्मचारी आंबा जंगल परिसरात गस्ती घालत असताना त्यांना सडा या ठिकाणी मोटारसायकल दिसली. त्यांनी ही माहिती शाहूवाडी आणि साखरपा पोलिसांना दिली. दोन्ही ठाण्यांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला. त्यानंतर त्यांना खोल दरीत दोन मृतदेह दिसले. मुसळधार पाऊस, धुके यामुळे मृतदेह काढण्यास अडथळा निर्माण झाल्याने शनिवारी ही मोहीम थांबवली होती. मात्र रविवारी पुन्हा आंबा येथील बारा तरुणांचे पथक प्रमोद माळी यांच्या मार्गदशनाखाली मृतदेहाजवळ पोहोचले. यात देवरूख येथील राजू काकडे हेल्प अॅकॅडमीचे सात कार्यकर्ते सहभागी झाले.

शाहूवाडी पोलीस निरीक्षक विजय घेरडे, देवरूखच्या उपनिरीक्षक शबनम मुजावर, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे वनरक्षक सागर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पाच तासांच्या मोहिमेत कार्यकर्ते दुर्गंधी सोसत, निसरड्या कड्यावरून दगडी घळीत सडलेले दोन्ही मृतदेह पोत्यात भरून कड्याच्या आडव्या दिशेने वर काढले. दरम्यान आधी मठाधिपती आणि आता दोन्ही शिष्यांच्या या निधनाने मठात शोककळा पसरली आहे.