अजित पवारांचे ते म्हणणे पचनी पडणारे नाही; युगेंद्र यांनी तालुका पिंजून काढला, जय पवार तालुक्याच्या दौऱ्यावर, आता पार्थ मैदानात उतरले

बारामती(दीपक पडकर): राज्यातील विधानसभा निवडणूक जवळ येवू लागल्याने बारामती तालुक्यात पवार कुटुंबातील तरुण पिढी आता गावोगावी फिरू लागल्याचे दिसत आहे. लोकसभेतील विजयानंतर लागलीच युगेंद्र यांनी बारामती तालुका पिंजून काढला. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय पवार तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. आता पवार यांचे ज्येष्ठ पुत्र पार्थ हे अॅक्टीव्ह झाले आहेत.

बारामतीत विधानसभेची निवडणूक पवार विरुद्ध पवार अशीच होणार हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. महायुतीकडून अजित पवार हेच येथील उमेदवार असतील. त्यांनी जय पवार यांना संधी देवू असे सुतोवाच केले आहे. परंतु महायुतीला ते पचनी पडणारे नाही. लोकसभेला घरातीलच उमेदवार द्यावा यासाठी महायुतीकडून प्रयत्न झाले. परिणामी अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा यांना उमेदवारी दिली. तेथे त्यांचा मोठा पराभव झाला. त्यामुळे कोणी काही म्हटले तरी विधानसभेला अजित पवार हेच उमेदवार असतील यात शंका नाही.
Ajit Pawar & Baramati: बारामतीसाठी अजितदादांनी जय पवारांना सॉफ्ट कॉर्नर तर दिला, पण बारामतीकरांच्या मनात काय…?

शरद पवार गटाकडून येथे युगेंद्र पवार प्रबळ दावेदार मानले जातात. अजित पवार व युगेंद्र पवार अशी सख्या काका-पुतण्याची लढाई येथे झाली तर ती अतिशय रंगतदार व अटीतटीची होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्यभर फिरत आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत आधी जय तर आता पार्थ पवार हे अॅक्टीव्ह झाले आहेत. गावोगावी ते दौरे करत आहेत. लाडकी बहिण योजनेचा प्रचार व प्रसार करत आहेत. नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत. ग्रामस्थांकडून ही त्यांचे जोरदार स्वागत होत आहे.
IND vs BAN: क्रिकेट खेळण्याची ही योग्य वेळ आहे का? बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारावर अशा पद्धतीची शांतता का? ऑस्ट्रेलियासारखी भूमिका घेण्याची हिम्मत आहे का?

दुसरीकडे आत्या सुप्रिया सुळे यांची लोकसभेला भक्कम खिंड लढवणाऱया युगेंद्र यांनी निवडणूक निकाल लागल्या पासूनच बांधणी सुरु केली आहे. त्यांचे आजवर तीनदा दौरे झाले आहेत. बारामतीत ते विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. त्यात आता पार्थ यांची भर पडली आहे.

लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना ४८ हजार मतांचे मताधिक्य मिळाले होते. अजित पवारांनी विकास कामे केली असली तरी बारामतीकरांनी मतांचे मताधिक्य सुप्रिया सुळेंच्या पारड्यात टाकले होते. आता विधानसभेत काय होणार याची सर्वांना उत्सुकता आहे.

Source link

Baramati Assembly constituencybaramati newsBaramati News Todayअजित पवारजय पवारपार्थ पवारमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकयुगेंद्र पवार
Comments (0)
Add Comment