Amruta Fadnavis : देवेंद्रजींना कोट्यावधी बहिणी तर मला नणंद मिळाल्या आम्ही सुख-दु:ख वाटून घेणार – अमृता फडणवीस

नागपूर : नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची घोषणा केली आहे. तसेच लाभार्थी महिलांना १५०० रु प्रती महिना देण्याची तरतूद या योजनेत आहे. अशातच रक्षाबंधनाच्या निमित्ताने राज्य सरकारने लाभार्थी महिलांच्या खात्यात ३००० रुपये जमा केले आहे. त्यामुळे राज्यातील महिला वर्ग आनंदी वातावरणात आहे. राज्य सरकारकडून देखील हि योजना घराघरात पोहोचवली जात आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबाबत आपलं मत केलं आहे.

देवेंद्रजींना कोट्यावधी बहिणी तर मला नणंद मिळाल्या

अमृता फडणवीस म्हणाल्या की, ”देवेंद्रजींना कोट्यवधी बहिणी मिळाल्या असून मला सुद्धा नणंद मिळाली आहे.आता राज्यातील बहिणींसोबत नणंद भावजय याचं माझे नवे नाते सुरू झाले आहे.आणि हे नवे नातं मला खुप आवडलं” असं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

अमृता फडणवीस यांनी आज नागपुरातील त्यांच्या निवासस्थानी दिव्यांगांना राखी बांधली आणि त्यांना आनंदी भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या, त्याचवेळी अमृता फडणवीस यांनी महिला पोलीस कर्मचाऱ्यांनाही राखी बांधली. पुढे बोलतांना अमृता फडणवीस म्हणाले, ”आता माझे नणंद भावजयच्या राज्यातील बहिणीशी नवीन नाते निर्माण झाले आहे. मला हे नवीन नातं खूप आवडले. आता या निमित्ताने एकमेकांचे सुख-दु:ख वाटून घेणार आहोत. ”
जरांगेंचे फडणवीसांबद्दलचे विधान योग्यच; आरक्षणात देवेंद्र फडणवीस यांचाच अडथळा: नाना पटोले

बहिणींच्या सुरक्षेसाठी ‘लाडकी बहिण’ योजना सुरू केली

लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता राज्यातील काही महिलांच्या खात्यामध्ये नुकतीच जमा झाला आहे . मात्र आगामी निवडणुका लक्षात घेऊन महिला मतदारांना आपल्या बाजूने खेचण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आल्याची टीका विरोधक करत आहेत. त्यावर अमृता फडणवीस म्हणाल्या की, ”राज्यातील महाआघाडी सरकारने बहिणींच्या सुरक्षेसाठी लाडकी बहिण योजना सुरू केली. त्यात राजकीय दृष्टिकोन नाही. देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेल्या लाडकी बहिण योजनेचा फायदा कोट्यावधी भगिनींना होत आहे. देवेंद्र फडणवीस यांची पारदर्शकता, प्रामाणिकपणा, त्यांनी यापूर्वी सुरू केलेल्या जलयुक्त शिवारसारख्या चांगल्या योजनांवर विरोधकांकडून टीका होत होती.त्यामुळे ते अजूनही टीका करत आहे. लाडकी बहीण ही सरकारने चांगल्या हेतूने ही योजना सुरू केली आहे. आशा आहे की ते पुढेही चालू ठेवतील आणि आवश्यकतेनुसार विस्तार करतील. पूर्वी मी फक्त माझ्या दोन भावांनाच राखी बांधायचे. आता मी माझ्या अपंग बांधवांनाही राखी बांधत आहे.”असेही अमृता फडणवीस म्हणाल्या.

Source link

amruta fadnavisamruta fadnavis newsladki bahin yojanaladki bahin yojana updateअमृता फडणवीसअमृता फडणवीस बातम्यालाडकी बहीण योजनालाडकी बहीण योजना बातमी
Comments (0)
Add Comment