सुरक्षेसाठी ससूनचा मोठा निर्णय, सीसीटीव्ही वाढणवार, महिला डॉक्टरांना रात्री…

म. टा. प्रतिनिधी, पुणे: निवासी डॉक्टरांच्या संपामुळे ससून रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागातील (ओपीडी) रुग्णसंख्या सोमवारी निम्म्याने घटली. ‘ओपीडी’बरोबरच आपत्कालीन विभाग, विविध तपासण्यांची संख्याही घटल्याचे समोर आले आहे. सलग सात दिवसांपासून संप सुरू असल्याने रुग्णालयातील रुग्णसेवेला फटका बसत आहे. त्यामुळे संप सुरू राहिल्यास रुग्णसेवा विस्क‌ळीत होण्याची शक्यता आहे.

कोलकात्यातील वैद्यकीय महाविद्यालयात महिला निवासी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा मुद्दा समोर करून निवासी डॉक्टरांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न सोडविण्यासाठी सोमवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. यल्लपा जाधव, मार्ड संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. दस्तगीर जमादार व पदाधिकारी, सुरक्षा विभागाचे अधिकारी, बंडगार्डन पोलिस ठाण्यातील अधिकारी, परिचारिकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सुरक्षात्मक उपाययोजना सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येत असल्याने संबंधित विभागाचे अधिकारीही या वेळी उपस्थित होते. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि ससूनच्या परिसरात सुरक्षात्मक उपाययोजना करण्याबाबत बैठकीत निर्णय घेण्यात आले.
Kolkata Case: सात डॉक्टर, महिला इंटर्न, जरासंधाप्रमाणे पाय तोडले, शूजसकट तिच्यावर चालले, त्या पोस्टने खळबळ

बैठकीतील निर्णय

– संपूर्ण परिसरात दिवे लावणार.

– सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढण्यात येणार.

– महिला डॉक्टरांना रात्री महिला सुरक्षारक्षक देणार.

– सुरक्षारक्षकांची संख्या वाढवणार.

सद्यस्थिती

– कॅमेऱ्यांची संख्या : ३५२

– नव्याने बसविण्यात येणारे कॅमेरे : १००

– सुरक्षारक्षकांची संख्या : २२०

– वाढवले जाणारे सुरक्षारक्षक : ८३

रुग्णसंख्येची आकडेवारी

विभाग दररोजची रुग्णसंख्या सोमवारी (दुपारी २पर्यंत)

ओपीडी १,६७० ८३२

आयपीडी १,१०९ १,००३

आपत्कालीन २२५ ८४

गंभीर शस्त्रक्रिया ४८ १८

किरकोळ १४५ २८

Source link

crime newsdoctor raped in hospitalkolkata doctor casekolkata doctor murder casekolkata doctor rape and murder caserape and murderSanjay Roy kolkataकोलकाता डॉक्टर बलात्कारकोलकाता बलात्कार हत्या प्रकरणडॉक्टरवर बलात्कारडॉक्टरवर बलात्कार आणि हत्याबलात्कार करुन हत्यासरकारी रुग्णालयात बलात्कार
Comments (0)
Add Comment