शालिमार येथील ‘आयएमए’च्या हॉलमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष वामन गायकवाड, महानगराध्यक्ष अविनाश शिंदे, संजय साबळे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण बागूल, विश्वनाथ भालेराव, युवक महाराष्ट्र सदस्य चेतन गांगुर्डे, युवक शहराध्यक्ष रवी पगारे, महिला जिल्हाध्यक्ष उर्मिला गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष बजरंग शिंदे, बाळासाहेब शिंदे, सम्यक विद्यार्थी जिल्हाध्यक्ष महिर गजबे आदी उपस्थित होते.
स्वबळावर लढू आणि ताकद दाखवून देऊ
बैठकीत विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेण्यात आला. इच्छुक उमेदवारांची चाचपणी करून काहींच्या मुलाखतीही घेण्यात आल्या. विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवून आघाडीची ताकद आपण दाखवून देऊ शकतो, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. सर्व मतदारसंघांमध्ये सक्षम उमेदवार देण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
वंचितचा विधानसभेचा प्लॅन
आघाडीची बलस्थाने, व्यूहरचना यावरही बैठकीत चर्चा झाली. प्रत्येक मतदारसंघात मतदारांच्या घरी जाऊन त्यांच्या समस्या जाणून घ्या आणि त्या सोडविण्याचा प्रयत्न करा. लोकांशी संवाद वाढवा, आघाडीची विचारसरणी ध्येय-धोरणे लोकांपर्यंत पोहोचवा, अशा सूचना पदाधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आल्या.
‘लॅटेरल एन्ट्री’ला प्रकाश आंबेडकर यांचा कडाडून विरोध, केंद्र सरकारच्या निर्णयावर संताप
एससी, एसटी आणि ओबीसींना त्यांच्या घटनात्मक अधिकारांपासून वंचित ठेवण्याचे हे भाजपचे मॉडेल आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली. केंद्र सरकारमधील ४५ पदे मागच्या UPSC परीक्षेद्वारे भरण्याऐवजी दाराने भरण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर प्रकाश आंबेडकर यांनी संताप व्यक्त केला.
मी आधीही म्हणालो होतो, आज पुन्हा सांगतोय धर्म संकटात नाहीय, आरक्षण संकटात आहे. बहुजनांना त्यांच्या घटनात्मक अधिकारांपासून वंचित ठेवण्याचे भाजपचे मॉडेल आहे. नोकरशाहीतील कोणत्याही नियुक्तीसाठी आरक्षण दिले पाहिजे, यासाठी वंचित मोठे आंदोलन उभे करेल, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.