पिंपरीत भाजपला मोठा दणका, ताकदवान नेत्याच्या हाती शिवबंधन, गाड्यांच्या ताफ्यात ‘मातोश्री’वर

प्रशांत श्रीमंदिलकर, पिंपरी चिंचवड, पुणे : लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजण्यास सुरुवात झाली आहे. पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरातील भाजपच्या दिग्गज नेत्याने पक्षाला धक्का दिला आहे. रवी लांडगे भारतीय जनता पक्षाची साथ सोडून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश करत आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये महायुतीसाठी हा मोठा हादरा मानला जात आहे.

रवी लांडगे आज मुंबईत ‘मातोश्री’वर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन हाती बांधणार आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये भाजप नेते महेश लांडगे यांना भोसरी विधानसभेमध्ये मोठा धक्का बसणार आहे.

महेश लांडगे यांनी भाजपचा विचार सोडला असून ते आता वैयक्तिक राजकारण करत आहेत. त्यामुळे विकासाला खीळ बसली आहे. आपण भाजपला सोडून उद्धव ठाकरे गटात प्रवेश करत असल्याचे रवी लांडगे यांनी सांगितले आहे. रवी लांडगे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माझी विरोधी पक्ष नेते आहेत. त्यातच ते महेश लांडगे यांचे अत्यंत निकटवर्ती मानले जातात. त्यांच्या या प्रवेशाने महेश लांडगे यांना झटका बसणार आहे.
Nawab Malik : मलिक विधानसभेला हवेत, पण फडणवीसांना अमान्य, अजितदादांनी मधला मार्ग काढला
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे भाजपचे माजी शहराध्यक्ष, दिवंगत नेते अंकुशराव लांडगे यांचे ते पुतणे आहेत. तसेच माजी विरोधी पक्ष नेते बाबासाहेब लांडगे यांचे ते पुत्र आहेत. घरातूनच राजकीय वारसा मिळाल्याने लहानपणापासूनच रवी लांडगे राजकारणात सक्रिय आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये अनेक जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत.

रवी लांडगे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत भाजपचे बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आले होते. लांडगे कुटुंब हे पिंपरी चिंचवडच्या राजकारणातील अत्यंत जुने आणि निष्ठावंत कुटुंब म्हणून ओळखले जाते. मात्र रवी लांडगे यांनी केलेला हा प्रवेश उद्धव ठाकरे गटासाठी नवसंजीवनी देणारा ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
Congress Candidates : काँग्रेसकडे उमेदवारी मागणाऱ्या २१ इच्छुकांची नावं जाहीर, आता चेंडू हायकमांडच्या कोर्टात
यापूर्वी देखील उद्धव ठाकरे यांनी पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला मोठा धक्का दिला होता. एकनाथ पवार यांनी भाजपची साथ सोडत उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला होता. मात्र आज रवी लांडगे उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याने पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. तीन ते चार हजार कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश केला जाणार असल्याचे रवी लांडगे यांनी सांगितले आहे.

Source link

BJP Leader joins Uddhav Thackeray Shiv Senamaharashtra assembly election 2024pimpri chinchwad newsVidhan Sabha Nivadnukउद्धव ठाकरे शिवसेनापिंपरी चिंचवड भाजप धक्कामहेश लांडगेरवी लांडगे ठाकरे गटात
Comments (0)
Add Comment