अजितदादांना लिहिलेले पत्र सापडत नसेल तर मी देतो, संजय राऊतांचा फडणवीसांवर कडाडून प्रहार

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी पुराव्यानिशी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने गंभीर आरोप केले. त्यामुळे चिडलेल्या फडणवीस यांनी मलिक यांच्यावर नाहक सूडबुद्धीने ईडी सीबीआयची कारवाई केली. सोमवारी नवाब मलिक यांनी सरकारमधील घटकपक्षाला पाठिंबा दिला. नवाब मलिक जेव्हा जामिनावर सुटून आले आणि विधानसभेत सरकारी बाकांवर बसले तेव्हा नीतिमत्तेचा पुळका आल्यासारखे फडणवीस यांनी मलिकांविरोधात अजित पवार यांना भले मोठे पत्र लिहिल होते. आज देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ते पत्र हरविले आहे काय? त्यांना सापडत नसेल तर माझ्याकडे ते पत्र आहे, ते मी फडणवीस यांना देतो. कारण फडणवीसांचं नवाब मलिकांबाबतचं पत्र म्हणजे राष्ट्रभक्तीचा नमुना सांगणारे ऐतिहासिक दस्ताऐवज आहे, अशी सडकून टीका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केली.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या नेतृत्वात राज्यभरात जन सन्मान यात्रा काढण्यात आली आहे. रविवारी पुण्यात असलेली यात्रा सोमवारी मुंबईत दाखल झाली. अणुशक्तीनगरचे आमदार नवाब मलिक यांना उमेदवारी देण्यास भाजपचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत त्यांची कन्या सना मलिक यांना पक्षाकडून तिकीट मिळणार हे जवळपास निश्चित झाले. अजित पवार यांनी नवाब मलिक यांच्यासोबत एकत्रित भोजन केले. याचवरून संजय राऊत यांनी फडणवीस यांना लक्ष्य केले.
Nawab Malik : मलिक विधानसभेला हवेत, पण फडणवीसांना अमान्य, अजितदादांनी मधला मार्ग काढला

पत्र मागे घ्या, त्यांच्यावर चालविलेले खटले खोटे आहेत हे जाहीर करा

देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्याबाबत अजित पवार यांना लिहिलेले पत्र सापडत नसेल तर मी त्यांना देतो, माझ्याकडे पत्राची कॉपी आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना नवाब मलिकांबाबत लिहिलेले पत्र हे राष्ट्रभक्तीचा नमुना सांगणारे ऐतिहासिक दस्ताऐवज आहे. देवेंद्र फडणवीस ठाम हे कसली ठाम भूमिका सांगत आहेत? मलिक आता सत्तापक्षात सहभागी झाल्याने फडणवीस यांनी ते पत्र मागे घ्यावे आणि त्यांच्यावर चालविलेले खटले खोटे आहेत, हे फडणवीस यांनी जाहीर करावे, असे टोले राऊत यांनी लगावले.

महायुतीचे ‘लाडके मलिक’

नवाब मलिक सत्तापक्षात सहभागी झाले आहेत. त्यामुळे ते आता ‘लाडके मलिक’ झाले आहेत. तसेच त्यांनी एकनाथ शिंदेंच्या दाढीला आग लावली आहे. देवेंद्र फडणवीस एक नंबरचे खोटे आहेत, असे संजय राऊत म्हणाले.

Source link

devendra fadanvisNawab MalikNawab Malik Support Mahayuti GOVTSanjay RautSanjay Raut Attack Devendra Fadanvisदेवेंद्र फडणवीसनवाब मलिकसंजय राऊत
Comments (0)
Add Comment