डाऊन मार्गावरील दिवा/पनवेल/कर्जतपर्यंत वळवलेल्या गाड्या
22159 छशिमट-चेन्नई CSMT MAS CSMT दुपारी १२.४५ वाजता
11019 छशिमट-भुवनेश्वर CSMT BBS CSMT दुपारी २ वाजता
22732 छशिमट-हैदराबाद सुपरफास्ट CSMT HYB CSMT दुपारी २.१० वाजता
22497 श्रीगंगानरगर- तिरुचिरापल्ली SGNR TPJ
19667 उदयपूर-म्हैसूर UDZ MYS
11029 छशिमट-कोल्हापूर सकाळी दहा वाजल्यापासून बदलापूर येथे थांबली असून कल्याण-पनवल-कर्जत मार्गे नेली जाणार
अप मार्गावरील कर्जत/पनवेल/दिवा मार्गे वळवलेल्या गाड्या
22160 चेन्नई-छशिमट
22731 हैदराबाद-छशिमट
22226 सुरत-छशिमट वंदे भारत
14805 यशवंतपूर-बारमेर YPR BME
11014 कोईम्बतूर-लोटिट CBE -LTT
12164 चेन्नई-लोटिट MAS LTT
12263 पुणे निझामुद्दीन दुरंतो PUNE NZM DRNT
काय आहे प्रकरण?
बदलापूर शहरातील एका नमांकित शाळेत तीन वर्ष आठ महिने आणि सहा वर्ष वय असलेल्या दोन लैंगिक मुलींवर शिपायाने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेची तक्रार नोंदवण्यास विलंब झाल्यानंतर शाळेतील पालकांच्या संतापाचा उद्रेक झाला. याबाबत पालकांसोबत सर्वसामान्य जनताही रस्त्यावर उतरली. आधी सकाळी शाळेसमोर तीव्र निदर्शने करण्यात आली, त्याच वेळी आंदोलक रेल्वे स्थानकावर पोहोचले आणि ट्रॅकवर उतरले. त्यामुळे सकाळपासूनच लोकलचा खोळंबा झाला होता.
ज्या शाळेत ही घटना घडली, त्या शाळेत तोडफोड करण्यात आली. शाळेची तोडफोड करण्यामध्ये महिला आंदोलकही सहभागी आहेत. त्याच वेळी आंदोलकांनी बदलापूर रेल्वे स्टेशन येथे पोलिसांवरही दगडफेक सुरु केली.