या मोर्चाच्या नियोजनासाठी वणी, दिंडोरी व मोहबारी कळवण येथे बैठका घेण्यात आल्या. वणी येथे झालेल्या बैठकीसाठी चांदवड, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, देवळा, कळवण व सटाणा तालुक्यातील थकबाकीदार शेतकरी उपस्थित होते. यावेळी ३ सप्टेंबर रोजी नाशिकहून मुंबईकडे ५५ हजार शेतकऱ्यांच्या वतीने ट्रॅक्टर मोर्चा नेण्यात येणार आहे. १५ ऑगस्ट रोजी थकबाकीदार शेतकऱ्यांनी आपली नादारी घोषित केली आहे. आंदोलन स्थळावर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना शासनाचे प्रतिनिधी निवेदन देण्यात आले. त्यांच्यासमोरच आंदोलन घोषित करून ट्रॅक्टर मोर्चाचे नियोजन करण्यात आले.
या मोर्चासाठी गावोगावी थकबाकीदार शेतकऱ्यांची संवाद साधण्यात येत आहे. यावेळी समन्वय समितीचे अध्यक्ष भगवान बोराडे, आदिवासी संघर्ष समितीचे राज्य अध्यक्ष कैलास बोरसे, समिती सदस्य दिलीप पाटील, दगाजी अहिरे, जयराम बहीरम, कांतीलाल भोळे, गिरीधर पवार, सोमनाथ मोकाट यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. यावेळी भगवान बोराडे यांनी ट्रॅक्टर मोर्चासाठी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले. वणी येथील बैठकीच्या अध्यक्षस्थानी आदिवासी सेवक धोंडीराम फाईल यांनी स्वीकारले. तर मोहभारी येथील बैठकीचे अध्यक्षस्थान जयराम बहिरम होते. कर्जदार शेतकरी यावेळी उपस्थित होते.