Badlapur News : राज्यातील गृहखातं गप्प का बसलंय? बदलापूर घटनेवरून जयंत पाटलांचा फडणवीसांना सवाल

ठाणे (बदलापूर ) : बदलापूर अत्याचार घटनेचे संपूर्ण राज्यभरात उमटले आहेत.गेल्या आठ तासांपासून संतप्त नागरिकांनी रेल रोको आंदोलन सुरू केलं आहे. या घटनेचा संपूर्ण देशभरातून निषेध करण्यात येत आहे.अशातच राज्य सरकारवर विरोधकांकडून टीका केली आहे.शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. राज्यात अशा घटना घडत असताना गृहखातं मूग गिळून का बसले आहे? असा सवाल जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.

लाडक्या बहिणींच्या सुरक्षेची काळजी कोण घेणार?

जयंत पाटील म्हणाले की, ” घडलेली घटना अतिशय गंभीर आहे.मी त्याचा निषेध करतो. सध्या राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे. महिलांच्या अत्याचारासाठी आपण नोएडासारख्या भागांना नावे ठेवायचो.परंतु आता महाराष्ट्रात तीच परिस्थिती होऊ लागली आहे.सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली परंतु लाडक्या बहिणींच्या सुरक्षेचे काय? गृहखाते मूग गिळून गप्प का बसलयं? असा सवाल जयंत पाटलांनी देवेंद्र फडणवीसांना उपस्थित केला आहे.

संतप्त नागरिकांकडून शाळेची तोडफोड

या घटनेमुळे आज बदलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. त्याचदरम्यान,ज्या शाळेत ही घटना घडली होती. त्या शाळेत आता तोडफोड सुरु करण्यात आली आहे. या शाळेची तोडफोड करण्यामध्ये महिला आंदोलकही सहभागी आहेत. त्याचदरम्यान, आंदोलनकर्त्यांनी बदलापूर रेल्वे स्टेशन येथे दगडफेक सुरु केली आहे.

या दगडफेकीत काही महिलांना दुखापत झाली आहे. तसेच काही पोलीसही जखमी झाले आहेत. दरम्यान, या आंदोलनाला आता हिंसक वळण लागत आहे. शाळेच्या आत काही आंदोलक शिरले आहेत. पोलिसांकडून शाळेमध्ये अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत. बदलापुरात या घटेनमुळे अतिशय उद्रेक झाला आहे.

दरम्यान, मंत्री गिरीश महाजन हे आंदोलकांची समजूत काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. गेल्या ८ तासांपासून आंदोलन सुरू असून आरोपीला फाशी देण्यात यावी अशी मागणी नगरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच बदलापूर पोलिस ठाण्यातील अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांचे निलंबन करण्यात आले आहे.

Source link

Badlapurbadlapur crime newsBadlapur Newsबदलापूर अत्याचार प्रकरणबदलापूर घटनाबदलापूर बातमी
Comments (0)
Add Comment