Badlapur News : बदलापूर घटनेसंदर्भात आदित्य ठाकरेंकडून राष्ट्रपती द्रौपदी मूर्मूंकडे मोठी मागणी

ठाणे (बदलापूर ) : बदलापूर अत्याचार घटनेचे संपूर्ण राज्यभरात उमटले आहेत. गेल्या आठ तासांपासून संतप्त नागरिकांनी रेल रोको आंदोलन सुरू केलं होतं. या घटनेचा संपूर्ण देशभरातून निषेध करण्यात आला आहे. अशातच ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्याकडे शक्ती कायद्यासंदर्भात निर्णय घेण्याची मागणी केली आहे. आदित्य ठाकरेंनी त्या संदर्भातील ट्विट देखील केले आहे.

आदित्य ठाकरेंची पोस्ट काय?

आदित्य ठाकरेंनी लिहिलंय की, ”दररोज आम्ही महिलांसाठी “सेल्फ डिफेन्स क्लासेस” सुरू करण्याचा विचार करतो, यापूर्वी आम्ही सुरू केले होते.परंतु मनातील एक खोल आवाज मला विचारतो पण का? आणि आम्ही लवकरच क्लास सुरू करणार असलो तरी, दुर्दैवाने काळाची मागणी असल्याने, तरीही प्रश्न उरतो असं का आहे? विनयभंग, बलात्काराच्या घटना आपल्याला देशभरातून रोज ऐकायला मिळतात ज्यामुळे आपल्याला राग येतो आणि आजारी पडतो. त्यामुळे जलद न्याय, निष्पक्ष न्याय आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी हीच आमची अपेक्षा आहे.मानवते विरुद्धच्या गुन्ह्याला पूर्णपणे सहन न करण्याचे एक गंभीर उदाहरण म्हणजे बलात्कार आहे. आज बदलापूर प्रकरण ऐकून मन हेलावून गेलं.बलात्कार हा बलात्कार असतो.त्यात कुठेही वयाचा फरक नसतो.आम्हाला न्याय हवा आहे आम्हाला कठोर शिक्षेची उदाहरणे हवी आहेत ज्यामुळे या बलात्काऱ्यांच्या मनात भीती निर्माण होईल. मुर्मू जी महाराष्ट्र शक्ती विधेयकाला तिची प्रदीर्घ प्रलंबित संमती देतील, ज्यामुळे महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांवरील कायद्याचे सक्षमीकरण होईल”. असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

Raju Patil : राज्यात शक्ती कायदा लागू करा! बदलापूर प्रकरणात मनसे आमदाराची मागणी

पुण्यातही अत्याचाराची घटना

बदलापूर येथील घटनेमुळे संतप्त प्रतिक्रिया समोर येत असताना पुण्यातील एका नामांकित शाळेतच अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. याबाबत मिळाल्या माहितीनुसार, भवानी पेठ परिसरात असलेल्या एका नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना १५ ऑगस्टच्या दिवशी घडली. पीडित मुलगी ही सातवीच्या वर्गात शिकत आहे. तर अत्याचार करणारा आरोपी हा त्याच शाळेतील विद्यार्थी आहे. आरोपी विद्यार्थ्याचे वय १९ असून त्याचे नाव देवराज पदम आग्री असे आहे.

या प्रकाराबाबत पीडित मुलीच्या आईने समर्थ पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. १५ ऑगस्ट रोजी शाळेतील स्वच्छतागृहाजवळ हा प्रकार घडला. समर्थ पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी आरोपीविरुद्ध ७४,७५ (१) (i) पोक्सो ८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Source link

Badlapurbadlapur crime newsBadlapur Newsबदलापूरबदलापूर घटनाबदलापूर प्रकरणबदलापूर बातमी
Comments (0)
Add Comment