वामन म्हात्रे काय म्हणाले?
एक महिला पत्रकार वार्तांकन करत असताना वामन म्हात्रे यांनी तिच्या सोबत घाणेरडी भाषा वापरली आहे. ”तू अशा बातम्या देते जणू तुझ्यावरच बलात्कार झाला आहे”.असं वादग्रस्त विधान वामन म्हात्रे यांनी केलं आहे. म्हात्रे यांच्या विधानामुळे पत्रकारांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. त्याचबरोबर विरोधकांनी देखील म्हात्रे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
आधी वादग्रस्त विधान नंतर सावरासावर
वामन म्हात्रे यांनी वादग्रस्त विधान केल्यानंतर पुन्हा सावरा सावर करण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणाले की, ”मी कुठलही वादग्रस्त वक्तव्य केलं नाही. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. आंदोलनाच्या ठिकाणी चुकीची माहिती पोहोचवली जात होती. बलात्कार या शब्दाचा वापर केला जात होता.माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेण्यात आला”.असं म्हात्रे म्हणाले आहेत.
आरोपीकडे चिमूकल्यांना वॉशरूमला नेण्याची जबाबदारी होती
आरोपी अक्षय शिंदे याच्याकडे चिमूकल्यांना वॉशरूमला नेण्याची जबाबदारी देण्यात आली होती अशी माहिती समोर आली आहे. यामुळे शाळेच्या कामकाजावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. आरोपी अक्षय शिंदे हा बदलापूरच्या शाळेत 1 ऑगस्ट रोजी कंत्राटी पद्धतीनं कामावर रूजू झाला होता. दरम्यान याच काळात त्याने गैरफायदा घेतला.विशेष म्हणजे शाळेनं मुलींच्या स्वच्छतागृहांच्या साफ सफाईसाठी महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली नसल्याची माहिती समोर आली आहे.
मनसेकडून शक्ती कायदा लागू करण्याची मागणी
बदलापूर घटनेवरून मनसेचे आमदार राजू पाटील यांनी शक्ती कायदा लागू करण्याची मागणी केली आहे. राजू पाटील म्हणाले की, ”सकाळपासून लोकांकडून आंदोलन सुरु आहे. लोकांची जनभावना आहे कोणतीही राजकीय पक्ष सहभागी नाही अशावेळी सीएम शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांनी घटनास्थळी भेट दिली पाहिजे होती पण असे काही झाले नाही. शिक्षणमंत्री दीपक केसरकर येतात पण सीएम शिंदेंनी यायला हवे होते. रेल रोको गेले आठ तास सुरु आहे. लोकांचा आक्रोश आहे हा अशावेळी सरकारने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे.” असे मनसे आमदार राजू पाटील म्हणाले आहेत.