आमदार भास्कर जाधव पुढे म्हणाले की, बदलापूरची घटना अतिशय निंदनीय आहे. जी घटना घडली आहे त्याला सरकार जवाबदार आहे. पुणे येथील अग्रवाल खून प्रकरणात रक्ताचे नमुने बदलण्यात आल्यापासून जे काही घडल ते पोलिसांच्या सहकाऱ्या शिवाय झाले का? हिट एन्ड रन प्रकरणात सीसीटीव्ही असताना आरोपी शाह हा गायब कसा झाला, असा प्रश्न आमदार भास्कर जाधव यांनी यावेळी उपस्थित केला.
देवेंद्र फडणवीस यांचा गृहखात्यावर अजिबात वचक नाही. मध्यंतरी लोकसभेच निमित्त करून रजिनामा देत होते त्यांना माहित होते, आपल्या बोगस कारकिर्दीचा कधी तरी भांडा फुटणार आहे. त्यांना ही माहिती असल्यामुळे ते पळ काढत होते अशी टीका आमदार जाधव यांनी केली. गंभीर घटनेत चूक असताना देखील फडणवीस हे सभागृहात पोलिसांची बाजू घेत असतात. त्यामुळे मंत्री आपल्याला संभाळून घेतात म्हणून पोलीसाची हिम्मत वाढत असल्याच आमदार भास्कर जाधव म्हणाले.
कदम आणि चव्हाणांनी कुस्ती लढवावी, मी पंच म्हणून काम करायला तयार
शिवसेना शिंदे गटातील नेते रामदास कदम आणि राज्य मंत्री तथा भाजप नेते रविंद्र चव्हाण यांच्यात शाब्दिक वाद सुरु आहे. त्यांच्या या वादात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी उडी घेतली आहे. ते म्हणाले की, दुसऱ्या पक्षात काय चालू आहे, याकडेही माझे लक्ष नसते. मात्र रामदास कदम व रविंद्र चव्हाण हे दोघेही भाजपा नेते एकमेकांवर टीका करत आहेत. त्या सर्व टीका व आक्रमक बोलणे मी बारकाईने ऐकले आहे. त्यांचे व्हिडीओ पाहिले आहेत. मी कोकणातला असल्याने आता ते दोघे कधी रस्त्यावर येतील व त्यांची कुस्ती कधी होईल याकडे माझे लक्ष आहे. ज्या दिवशी हे दोघे एकमेकांसमोर येतील, त्यावेळी त्यांची कुस्ती बघण्याची माझी इच्छा आहे. आ देखे जरा किसमे हैं कितना हैं दम, असं दोघांनी एकमेकांना दाखवावा. जमल्यास मी त्याठिकाणी पंचगिरी करण्यास तयार आहे, अशी मिश्किल टिप्पणी भास्कर जाधव यांनी केली.
नांदेडमधील चार विधानसभा मतदारसंघावर दावा
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आमदार भास्कर जाधव यांनी नांदेड जिल्हातील मतदार संघाचा आढावा घेतला. विधानसभा निहाय पदाधिकाऱ्यांची बैठक देखील घेतली. अडचणीच्या काळात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ज्या निष्ठावंत शिवसैनिकांनी साथ दिली. त्याच शिवसैनिकांचा विधानसभेची उमेदवारी देताना प्राधान्याने विचार केला जाईल, असे सांगत आमदार भास्कर जाधव यांनी जिल्हातील चार मतदार संघावर दावा केला. उमेदवारी देताना पक्षाच्या अडचणीच्या काळात ज्या शिवसैनिकांनी खंबीरपणे साथ दिली, अशा शिवसैनिकांचा पहिल्यांदा विचार होईल. अपवादात्मक परिस्थितीत एखाद्या जागेवर दुसरा उमेदवार द्यावा लागेल, असेही ते यावेळी म्हणाले.