तुमचा पैसा नको, आधी लाडक्या बहिणीच्या मुलीला न्याय द्या; महिलांच्या भावनांचा उद्रेक

बदलापूर : बदलापुरमध्ये चार आणि सहा वर्षीय दोन चिमुकलींवर शाळेत लैंगिक अत्याचार करण्यात आला. सफाई कर्मचाऱ्याकडून हे दृष्कृत्य करण्यात आलं. १३ ऑगस्ट रोजी ही धक्कादायक घटना घडली. चिमुकलीवरील अत्याचाराची तक्रार दाखल करुन घेण्यासाठी १२ तास लागले होते. याप्रकरणी कोणतीही दखल घेण्यात आली नव्हती. अखेर संतप्त नागरिकांनी रस्तावर उतरत याविरोधात आंदोलन केलं. या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. महिला, पुरुष सर्वांनी एकत्र येत शाळेबाबेर आंदोलन केलं. त्यानंतर संतप्त जमावाने बदलापूर रेल्वे स्थानकात रेल्वे रुळावर उतरत रेलरोको आंदोलन केलं. यावेळी अनेक महिलांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करत सरकारला सवाल केला.
Who is Akshay Shinde : कोण आहे अक्षय शिंदे, ज्या नराधमाने बदलापुरात चिमुकल्यांसोबत केलं दृष्कृत्य
बदलापुरात इतक्या मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले असताना, इतका मोठा गुन्हा घडला असताना कोणताही राजकीय नेता किंवा बदलापूर शहरातील कोणीही पदाधिकारी तिथे बराच वेळ पोहोचले नव्हते. यावर महिलांनी संताप व्यक्त केला. ‘यावेळेला तुम्ही राजकारणी लोक इथे येऊ शकत नाही, तर तुमचा काय फायदा? तुम्ही आम्हाला लाडकी बहीण म्हणता, मग लाडक्या बहिणीच्या मुलींना न्याय देण्यासाठी कुठे आहात तुम्ही? आम्हाला तुमचा पैसा नको, तुमच्या दीड हजारांनी काही होणार नाही, पण आधी लाडक्या बहिणीच्या मुलीला न्याय द्या.’, अशी मागणी सरकारकडे करण्यात आली.
Akola News : अश्लिल व्हिडिओ दाखवत शिक्षकाकडून सहा विद्यार्थीनींचा विनयभंग, अकोल्यातील संतापजनक घटना
‘प्रशासनाच्या भरोवशावर आम्ही आमची मुलं सोडतो आणि काम करतो. पण जर आमची मुलंच सुरक्षित नसतील, तर आम्ही काम कशासाठी करू? आम्हाला तुमची लाडकी बहीण योजना नको, आम्हाला आता न्याय द्या, आमच्या मुलींना सुरक्षित ठेवा, नाहीतर आम्हाला आमच्या मुलींना घराबाहेर काढताना विचार करावा लागेल, की आमची मुलगी सुरक्षित आहे का?’, असा सवालही आंदोलनकर्त्या महिलांनी केला.
दरम्यान, सकाळपासून सुरू झालेलं आंदोलन संध्याकाळी जवळपास ६ पर्यंत सुरू होतं. आंदोलनकर्त्यांनी रेलरोको केल्याने दहा तास लोकल सेवा ठप्प झाली होती. मोठ्या संख्येने आंदोलन सुरू असतानाही दुपार होऊन गेली तरी कोणीही बदलापूर शहरातील नेते घटनास्थळी पोहोचले नव्हते. यावर अनेक आंदोलनकर्त्यांनी संताप व्यक्त करत अशा राजकारणी लोकांचा काय फायदा असा सवाल केला.

Source link

badlapur casegirl molested in badlapur schoolschool girl assault in badlapurबदलापूर चार वर्षीय मुलीवर अत्याचारबदलापूर लैंगिक अत्याचारबदलापूर शाळेत चिमुकलीवर अत्याचार
Comments (0)
Add Comment