Badlapur Case : सर्व मंडळी बाहेरचे, आंदोलन भरकटले! ठरवून केलेला स्टंट; भाजप आमदाराचे विधान

मुंबई : बदलापूरमध्ये सकाळपासून अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराबद्दल तीव्र संतापाची लाट पसरलेली आहे. तब्बल आठ तासाहून अधिक काळ नागरिकांनी बदलापूरात ठिकठिकाणी मोर्चे काढले. थेट मध्य रेल्वेच्या रुळावर येत रेल रोको केला पण याच आंदोलनाला भरकटलेले आंदोलन असे भाजप आमदार किसन कथोरे म्हणाल आहेत. बदलापूरात सकाळपासून सुरु असलेले आंदोलन भरकटले आहे असा आरोप कथोरे यांनी केला. बदलापूरात आंदोलन करणार सर्व मंडळी बाहेरचे आहेत तसेच एकही स्थानिक नाही असा दावा कथोरे यांनी केला. सकाळपासून बदलापूरात होणार आंदोलन म्हणजे ठरवून केलेला स्टंट आहे. उगाच लोकांना वेठीस धरले गेले असे विधान कथोरे यांनी केले आहे.

विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे काय म्हणाले?

बदलापूरच्या नागरिकांनी केलेले आंदोलन जनआक्रोश असल्याचे मत विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी मांडले. साडेतीन वर्षांच्या मुलींवर झालेला अन्याय राजकीय हेतूने प्रेरित आहे का? असा सवाल करत अंबादास दानवे यांनी पोलीसांच्या भूमिकेवर उपस्थित केला. अत्याचार झाल्यानंतर १२ तास पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दखल करण्यात येत नाही हे काय राजकीय हेतूने प्रेरित आहे का? नागरिकांना राज्य शासनाच्या विरोधात रोष व्यक्त केला आहे, तर यावर लाठीचार्ज का करता? पोलिसांना बिलकुल लाठीचार्ज करण्याची आवश्यकता नव्हती अशी भूमिका यावेळी अंबादान दानवे यांनी बोलून दाखवली.
साडेतीन वर्षाच्या मुलींवरील अन्याय राजकीय हेतूने प्रेरित? अंबादास दानवेंच्या विधानाने चर्चा

तपासासाठी SIT ची स्थापना

सरकारने थेट याच प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याची माहिती दिली आहे. बदलापूरातील गुन्ह्याचा तपास करण्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या आदेशानुसार एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याच्या विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.आरती सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सदर समिती गठीत करुन बदलापूर प्रकरणातील पुढचा तपास करण्यात येणार आहे.
Badlapur Case: बदलापूर प्रकरणावर सरकारची प्रतिक्रिया; राज्यातील शाळांमध्येही ‘विशाखा समिती’ स्थापन होणार

नेमके प्रकरण काय?

बदलापूर मधील एका नामांकित शाळेत साडेतीन वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.आणखी धक्कादायक बाब म्हणजे याबाबतची तक्रार देण्यासाठी मुलींचे कुटुंबीय बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गेल्यानंतर त्यांना गुन्हा दाखल होण्यासाठी तब्बल १२ तास ताटकळत ठेवण्यात आलं. त्यामुळे पोलिसांच्या कारभाराबाबत संताप व्यक्त होतोय. आज सकाळपासून बदलापूर परिसरात आंदोलन सुरु आहेत. आंदोलकांनी थेट रेल रोको केल्याचे निदर्शनास आले.

Source link

bjp on badlapur casekisan kathorekisan kathore on badlapur caseकिसन कथोरे भाजप आमदारबदलापूर अत्याचार केसबदलापूर क्राइम न्यूजबदलापूर प्रकरणबदलापूर स्कूल क्राइम
Comments (0)
Add Comment