साडेतीन वर्षाच्या मुलींवरील अन्याय राजकीय हेतूने प्रेरित? अंबादास दानवेंच्या विधानाने चर्चा

मुंबई : अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराविरोधात आज बदलापूर स्टेशन परिसरात आंदोलन झालेल्या ठिकाणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आंदोलकांना भेट दिली. यावेळी जखमी आंदोलक महिलांशी भेट घेऊन दानवेंनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच रेल्वे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांची भेट घेऊन झालेल्या घटनेचा आढावा घेतला. बदलापूरच्या नागरिकांनी केलेले आंदोलन जनआक्रोश असल्याचे मत त्यांनी मांडले. पैसे नको संरक्षण द्या, अशी भावना यावेळी आंदोलक महिलांनी दानवे यांच्याकडे व्यक्त केली. साडेतीन वर्षांच्या मुलींवर झालेला अन्याय राजकीय हेतूने प्रेरित आहे का? असा सवाल करत अंबादास दानवे यांनी पोलीसांच्या भूमिकेवर उपस्थित केला. अत्याचार झाल्यानंतर १२ तास पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दखल करण्यात येत नाही हे काय राजकीय हेतूने प्रेरित आहे असाही प्रश्न दानवे यांनी यावेळी उपस्थित केला. नागरिकांना राज्य शासनाच्या विरोधात रोष व्यक्त केला आहे. तब्बल १३ तास तक्रार दखल करत नाही तर जनता यावर रोष व्यक्त करत आहे तर यावर लाठीचार्ज का करता? पोलिसांना बिलकुल लाठीचार्ज करण्याची आवश्यकता नव्हती अशी भूमिका यावेळी अंबादान दानवे यांनी बोलून दाखवली.

नेमके प्रकरण काय?

बदलापूर मधील एका नामांकित शाळेत साडेतीन वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आणखी धक्कादायक बाब म्हणजे याबाबतची तक्रार देण्यासाठी मुलींचे कुटुंबीय बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गेल्यानंतर त्यांना गुन्हा दाखल होण्यासाठी तब्बल १२ तास ताटकळत ठेवण्यात आलं. त्यामुळे पोलिसांच्या कारभाराबाबत संताप व्यक्त होतोय. आज सकाळपासून बदलापूर परिसरात आंदोलन सुरु आहेत. मागील दहा तासांपासून बदलापूर रेल स्थानकावर संतप्त आंदोलनकर्त्यांकडून रेल रोको आंदोलन करण्यात आले.

सरकारकडून तपासासाठी SIT स्थापन

देवेंद्र फडणवीस यांनी काही वेळाआधीच बदलापूरच्या घटनेत प्रारंभीच्या काळात कारवाईत विलंब करणारे बदलापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आणि हेडकॉन्स्टेबल यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना दिले आहेत. सरकारने थेट याच प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याची माहिती दिली आहे. बदलापूरातील गुन्ह्याचा तपास करण्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या आदेशानुसार एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याच्या विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.आरती सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सदर समिती गठीत करुन बदलापूर प्रकरणातील पुढचा तपास करण्यात येणार आहे.

Source link

ambadas danve on badlapur casedevendra fadnavis on badlapur caseअंबादास दानवेअल्पवयीन मुलीबदलापूर अल्पवयीन मुली न्यूजबदलापूर केसबदलापूर केस अपडेटबदलापूर स्कूल
Comments (0)
Add Comment