Badlapur Case : खटला फास्ट ट्रॅक कोर्टात, उज्ज्वल निकम लढणार; सीएम शिंदे, फडणवीसांचे आले ट्वीट

मुंबई : बदलापूर मधील एका नामांकित शाळेत साडेतीन वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.आणखी धक्कादायक बाब म्हणजे याबाबतची तक्रार देण्यासाठी मुलींचे कुटुंबीय बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गेल्यानंतर त्यांना गुन्हा दाखल होण्यासाठी तब्बल १२ तास ताटकळत ठेवण्यात आलं. त्यामुळे पोलिसांच्या कारभाराबाबत संताप व्यक्त होतोय. आज सकाळपासून बदलापूर परिसरात आंदोलन सुरु आहेत. अशातच सीएम किंवा दोन्ही उपमुख्यमंत्र्‍यांनी साधी भेट सुद्धा दिली नाही अशी खंत मनसे आमदार राजू पाटील यांनी बोलून दाखवली आहे. तर सोशल मिडीयावरुन मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांनी घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

सीएम शिंदे यांचे बदलापूर अत्याचार प्रकरणावर ट्वीट

बदलापूरमध्ये एका शाळेत मुलींवर झालेल्या अत्याचाराची अतिशय गंभीर दखल मुख्यमंत्री यांनी घेतली असून अशा घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकांवर देखील कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे. आरोपीला कडक शासन करण्यात येईल, यासाठी जलदगती न्यायालयात तातडीने खटला चालविण्याचे निर्देशही त्यांनी दिले. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांशी देखील चर्चा केली. सखी सावित्री समित्या शाळांमध्ये स्थापन झाल्या आहेत किंवा नाही ते तपासण्याचे निर्देशही त्यांनी दिले. बदलापूर पूर्वेतील एका नामांकित शाळेत दोन मुलींवर झालेल्या अत्याचाराची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी चर्चा केली आणि अशा घटना होऊ नयेत म्हणून कायमस्वरूपी ठोस उपाय योजना करण्याचे सीएम शिंदे यांनी सांगितले आहे.

अजित पवारांचे बदलापूर प्रकरणावर ट्वीट

बदलापूरमध्ये शाळेतील चिमुकल्या मुलींवरील अत्याचाराची घटना अतिशय दुर्दैवी आणि अत्यंत संतापजनक आहे. या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. या घटनेचा बारकाईने तपास केला जाईल. त्यासाठी आयपीएस अधिकारी आरती सिंह यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी (SIT) स्थापन करण्यात आली आहे. हा अक्षम्य गुन्हा करणाऱ्या गुन्हेगारांची जराही हयगय केली जाणार नाही. त्या दृष्टिकोनातून या प्रकरणाची चौकशी जलद गतीने व्हावी, याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश ठाणे पोलीस आयुक्तांना देण्यात आले आहेत. कोणत्याही परिस्थितीत आपल्या लेकींना न्याय मिळालाच पाहिजे, ही माझी ठाम भूमिका आहे.

देवेंद्र फडणवीस बदलापूर प्रकरणावर ट्वीट

बदलापूरच्या घटनेत प्रारंभीच्या काळात कारवाईत विलंब करणारे बदलापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आणि हेडकॉन्स्टेबल यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे पोलिस आयुक्तांना दिले आहेत. बदलापूरच्या दुर्दैवी घटनेचा गतीने तपास करुन खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात येईल आणि यात विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधीज्ञ उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

Source link

badlapur casebadlapur case storyअजित पवार बदलापूर प्रकरणावरदेवेंद्र फडणवीस बदलापूर प्रकरणावरबदलापूर अत्याचार प्रकरणबदलापूर अल्पवयीन मुली केसबदलापूर शाळा न्यूजसीएम शिंदे बदलापूर प्रकरणावर
Comments (0)
Add Comment