Nashik Vidhan Sabha: जागावाटपावरुन ‘मविआ’त रस्सीखेच; राष्ट्रवादीला हवेत ९ मतदारसंघ, ठाकरे, कॉंग्रेसच्या जागांवरही दावा

नाशिक : विधानसभेसाठी महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित झालेले नसतानाच नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी (शरद पवार गट) काँग्रेसने पंधरापैकी तब्बल नऊ मतदारसंघांवर दावा ठोकला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत जागावाटपावरून रस्सीखेच रंगणार असल्याचे चित्र आहे.

‘राष्ट्रवादी’ च्या नाशिकमधील पदाधिकाऱ्यांनी या मतदारसंघांमध्ये पक्षाला अनुकूल स्थिती असून, निश्चित विजय मिळेल असा दावा खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे केला आहे. विशेष म्हणजे नाशिक पश्चिम आणि मध्य या विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना ठाकरे गटाने परस्पर उमेदवार जाहीर केले असतानाच काँग्रेसपाठोपाठ आता शरद पवार गटानेही या दोन्ही मतदारसंघांवर दावा ठोकला आहे. परिणामी आगामी काळात दावे-प्रतिदावे रंगणार आहेत. लोकसभा निवडणूक आटोपल्यानंतर महाविकास आघाडीसह महायुतीचे घटकपक्ष आता विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. भाजपने जिल्हानिहाय प्रभारींच्या नियुक्त्या करीत बैठकांवर जोर दिला आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या जनसंवाद यात्रेपाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्राही जिल्ह्यात येऊन गेली. शिवसेना शिंदे गटाकडूनही विधानसभानिहाय प्रभारी आणि निरीक्षक नियुक्त केले गेले आहेत. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही राज्यातील मतदारसंघांचे दौरे सुरू केले आहेत.

काँग्रेसनेदेखील इच्छुकांकडून अर्ज मागविले आहेत. त्या पाठोपाठ आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून भगवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनीही जिल्ह्यातील मतदारसंघांचा दौरा करून निवडणूक तयारीचा आढावा घेतला. त्यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्यात शहराध्यक्ष गजानन शेलार यांच्यासह जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, शहराध्यक्षा अनिता दामले आदींनी खासदार सुळे यांच्याकडे विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्श्वभूमीवर नाशिक मध्य व नाशिक पश्चिमसह, चांदवड देवळा, सटाणा यासह नऊ विधानसभा मतदारसंघ पक्षाला मिळावेत, अशी मागणी करीत या मतदारसंघांवर दावा केला. दिंडोरी, सिन्नर, येवला, कळवण, निफाड या मतदारसंघांवरही शरद पवार गटाने दावा केला आहे. या दाव्यामुळे ठाकरे गट आणि काँग्रेसमधील इच्छुकांत चलबिचल निर्माण झाली असून, पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेतात याकडे त्यांचे लक्ष लागले आहे. मध्य, पश्चिमबाबत प्रतिदावा नाशिक लोकसभेत शिवसेना ठाकरे गटाच्या राजाभाऊ वाजेंनी शिवसेना शिंद गटाच्या हेमंत गोडसेंचा पराभव केल्याने ठाकरे गटाने शहरातील दोन मतदारसंघांवर दावा ठोकला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये जागावाटप सुरू असताना नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांची, तर नाशिक मध्यमधून माजी आमदार वसंत गिते यांच्या नावाची घोषणा केली आहे. ‘मविआ’चे जागावाटप होण्यापूर्वीच ठाकरे गटाकडून परस्पर उमेदवारी जाहीर केली आहे.
Supriya Sule : तुरुंगात जाणारे भीतीने सत्तेत गेले! महिला मेळाव्यात अजित पवार, भुजबळांना सुप्रिया सुळेंचा टोला
पूर्व, मध्यवर काँग्रेसचाही डोळा

नाशिक पश्चिम मतदारसंघावर ठाकरे गटाकडून माजी आमदार वसंत गितेंच्या नावाची घोषणा झाली असली, तरी या मतदारसंघावर काँग्रेसने आधीच दावा सांगितला आहे. यासोबतच नाशिक पूर्व मतदारसंघही काँग्रेसला हवा आहे. गत निवडणुकीत नाशिक मध्यमधून काँग्रेसच्या डॉ. हेमलता पाटील यांनी उमेदवारी करीत भाजप आमदार देवयानी फरांदेसमोर कडवे आव्हान उभे करून दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती. त्यामुळे आताही डॉ. पाटील यांच्यासह काँग्रेसमधील इच्छुकांनी या मतदारसंघात अप्रत्यक्षपणे प्रचाराला सुरुवात केली आहे.

Source link

Congressmahavikas agahdiNashik Vidhan Sabhancp sharad power groupshivsena thackeray groupदेवयानी फरांदेनाशिक पश्चिम मतदारसंघनाशिक बातम्यावसंत गितेहेमलता पाटील
Comments (0)
Add Comment