तोंड दाबलं, फरफट नेलं, हातपाय बांधले, तोंडात कापड अन् मग… नातींनी आजीला निर्घृणपणे संपवलं

म. टा. प्रतिनिधी,नागपूर: अल्पवयीन लहान बहिणीसह छत्तीसगडमध्ये जाऊन स्वत:च्या आजीला ठार मारणाऱ्या तरुणीला मंगळवारी नागपुरात अटक करण्यात अली. भिलाई पोलिसांनी ही कारवाई केली. दीपज्योतकौर बलजिंदर सिंग संधू (वय १८, रा. बाबा लक्ष्मण अपार्टमेंट, आवळेबाबू चौक), असे अटकेतील तरुणीचे तर अतिंदरकौर अमरसिंग साहनी (वय ५६, रा. पुरई, भिलाई), असे मृत आजीचे नाव आहे.

आजीची संपत्ती मिळवण्यासाठी केली हत्या

आजीची संपत्ती मिळविण्यासाठी आजीची हत्या केल्याची कबुली आरोपी बहिणींनी दिली आहे.
Badlapur Girls Assault: आई, मला ‘शू’च्या जागी मुंग्या चावतायत, बदलापूर अत्याचाराची घटना अशी झाली उघड

आजीचे तोंड दाबले, हातपाय बांधले, स्टीलच्या बाटलीने आजीच्या डोक्यात वार

मिळालेल्या माहितीनुसार, २४ जुलैला दीपज्योतकौर आणि तिची बहीण छत्तीसगड एक्सप्रेसने दुर्ग येथे आजी अतिंदरकौर यांच्या घरी गेल्या. घरात शिरताच त्यांनी अतिंदरकौर यांचे तोंड दाबले. फरफट त्यांना खोलीत नेले. तेथे त्यांचे हातपाय बांधले. त्यांच्या तोंडात कापड कोंबले. पाणी पिण्याच्या स्टीलच्या बाटलीने दोघींनी अतिंदरकौर यांच्या डोक्यावर वार केले. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर दोघींनी आलमारीतील दागिने, मोबाइल व ४० हजार रुपयांसह पाच लाखांचा ऐवज चोरला. दरवाजाला कुलूप लावून अतिंदर यांचीच मोपेड घेऊन दोघी राजनंदगाव येथे पोहोचल्या. तिथे बसमध्ये मोपेड टाकून दोघीही नागपुरात आल्या.

अशी उघडकीस आली घटना

हत्येनंतर दोन दिवसांनी अतिंदर यांच्या नातेवाइक राजप्रीत यांनी त्यांच्या मोबाइलवर संपर्क साधला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्या अतिंदर यांच्या घरी गेल्या. दरवजाला कुलूप असल्याने त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने ते तोडले. आतमध्ये गेल्या असता त्यांना अतिंदर यांचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळला.

संपत्ती आणि पैशांसाठी मारण्याची धमकी दिली होती

याप्रकरणी भिलाई पोलिसांनी तपास सुरू केला. चौकशीदरम्यान संपत्ती व पैशासाठी दीपज्योतकौर व तिच्या बहिणीने अतिंदरसिंग यांना ठार मारण्याची धमकी दिली होती, अशी माहिती समोर आली. त्यामुळे भिलाई पोलिसांचे पथक नागपुरात आले. चौकशीदरम्यान दोघींनी आजीचा खून करून दागिने चोरल्याचे मान्य केले.

Source link

crime for propertycrime news todaymarathi batmyanagpur batmyanagpur sisters killed grandmotherआजीची निर्घृण हत्यानागपूर आजीची हत्यानागपूर क्राइम बातम्याबहिणीच्या मदतीने आजीची हत्या
Comments (0)
Add Comment