पुणेकरांसाठी Good News! आता एका क्लिकवर निघणार PMPचं तिकीट, ३ दिवसांत ५० हजार प्रवाशांना फायदा, असा आहे अ‍ॅप…

म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘पुणे महानगर परिवहन महामंडळा’चे (पीएमपी) अॅप सुरू झाल्यानंतर तीन दिवसांतच ५० हजार नागरिकांनी ते डाउनलोड केले आहे. या अ‍ॅपचा प्रवाशांनी वापर सुरू केला असून, तीन दिवसांत सहा हजार नागरिकांनी त्यावरून तिकीट काढले आहे. ‘पीएमपी’ बसचे लाइव्ह ट्रॅकिंग दिसणाऱ्या ‘आपली पीएमपीएमएल’ अ‍ॅपचे स्वतंत्र्यदिनी उद्घाटन झाले होते. शनिवारपासून ते प्रवाशांच्या सेवेत रुजू झाले.

अ‍ॅपद्वारे मिळणाऱ्या सुविधा

– अ‍ॅपवरून प्रवाशांना बसचे लाइव्ह लोकेशन दिसत असून, तिकीट आणि दिवसाचा पासही काढता येत आहे.
– थांब्यावर उभारलेल्या प्रवाशांना कोणत्या मार्गावरील बस येत आहे, पुढील बस किती वेळात येणार आहे आदी माहिती ‘एका क्लिक’वर मिळत आहे.
– अ‍ॅपवरून प्रवाशांना ‘मेट्रो’चे तिकीटही काढण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

अ‍ॅप डाउनलोडचे वाढले प्रमाण

पहिल्या तीन दिवसांमध्ये ४८ हजार प्रवाशांनी अ‍ॅप डाउनलोड केले आहे. दररोज अ‍ॅप डाउनलोड करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. याशिवाय प्रवाशांनी अ‍ॅपवरून तिकीट काढण्यासही सुरुवात केली आहे. पहिल्या दिवशी पाचशे प्रवाशांनी अ‍ॅपद्वारे तिकीट काढले. सोमवारी दिवसभरात २२०० प्रवाशांनी अ‍ॅपद्वारे तिकीट काढले. याशिवाय दीड हजार प्रवाशांनी अ‍ॅपवरून पास काढला. आतापर्यंत अ‍ॅपवरून तिकीट आणि पास काढणाऱ्यांची संख्या सहा हजारांवर गेली आहे. अ‍ॅपवरून तिकीट काढल्यानंतर आतापर्यंत १.८४ लाख रुपयांचे उत्पन्न ‘पीएमपी’ला मिळाले आहे.

अ‍ॅपची माहिती देणारा व्हिडिओ

‘अ‍ॅप सुरू झाल्यानंतर ते वापरण्यात प्रवाशांना अडचणी येत होत्या. याशिवाय काही महत्त्वाच्या गोष्टी दिसत नसल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून करण्यात येत होत्या. या पार्श्वभूमीवर ‘पीएमपी’ने अ‍ॅप कसे वापरावे, याची माहिती देणारा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर प्रसारित केला आहे. या व्हिडिओमध्ये अ‍ॅप वापराची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे,’ अशी माहिती ‘पीएमपी’चे जनसंपर्क अधिकारी सतीश घाटे यांनी दिली.

पीएमपीने अ‍ॅप निर्मितीसाठी वर्ष खर्ची घातले. तरीही या अ‍ॅपमध्ये अजूनही बऱ्याच अडचणी येत आहेत. अ‍ॅपद्वारे मार्गानुसार तिकीट काढता येते; मात्र बस नसलेला मार्ग अ‍ॅप दाखवत नाही. त्यामुळे बस बदलून ईप्सित स्थळी कसे जावे, याचे मार्गदर्शन अ‍ॅपने करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर अजूनही अ‍ॅपमध्ये बऱ्याच सुधारणा करण्यास वाव आहे.– संजय शितोळे, पीएमपी प्रवासी मंचगर्दीच्या वेळी ‘टीसी’ असतात तरी कुठे? नियमित तिकीट तपासणीअभावी एसी, फर्स्ट क्लासमध्ये वाढती घुसखोरी
६,३३८
अ‍ॅपवरून तिकीट, पास काढणारे

१.८४ लाख रुपये
अ‍ॅपवरून मिळालेले उत्पन्न

४८ हजार
अ‍ॅप डाउनलोड केलेल्यांची संख्या

Source link

pmp bus live locationpmp new appPMP Online Ticket Servicepmpl bus servicepune metro projectपुणे बातम्यापुणे मराठी बातम्यापुणे महानगर परिवहन महामंडळ
Comments (0)
Add Comment