नाशिकमधील कमी पर्जन्यमान, प्रदूषण, वाढते तापमान रोखण्यासाठी, तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनानुसार महापालिकेने अंमलबजावणी सुरू केली आहे. नागरिकांमध्ये जागरूकता यावी, यासाठी १९ ऑगस्ट रोजी शहरातील सात मूर्तिकांरावर कारवाई करण्यात आली आहे. या सातही स्टॉलधारकांकडून ७० हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.श्रीरामरूपी गणेशाचा ट्रेंड अयोध्येतील नव्या मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर आता त्याचे प्रतिबिंब यंदाच्या गणेशमूर्तीमध्येही पाहायला मिळत असून, श्रीरामाच्या रूपातीलमूर्तीला मागणी वाढली आहे. शहरात लहान-मोठ्या आकारातील मूर्ती आकाराला आल्या आहेत. गणेशभक्तांनीही श्रीरामाच्या रूपातील गणेशमूर्तीची मागणी नोंदवली गेली.
मोफत शाडू माती देणार
शाळांमध्येही जनजागृती केली जाणार असून, विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणेशाची स्थापना करण्याची शपथ दिली जाणार आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी महापालिका शंभर टन शाडू माती खरेदी करणार असून, शहरातील सहाही विभागांमध्ये तिचे वितरण केले जाणार आहे. ही माती सर्व नागरिकांना व मंडळांना मोफत पुरवली जाणार आहे.
प्लास्टिक फुलांवरील बंदी कागदावरच
गणेशोत्सवासह विविध उत्सवांमध्ये वापरल्या जाणारी प्लास्टिकची फुले, रंगीत, नक्षीदार प्लास्टिकच्या माळा, सजावट साहित्यावर बंदीचा निर्णय अनुत्तरित ठेवल्याने यंदाही बाजारपेठांमध्ये निकृष्ट दर्जाच्या प्लास्टिकच्या फुलांचे असंख्य प्रकार दाखल झाले आहेत. राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणाने आदेश देऊनही केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लास्टिक फुले, सजावट साहित्याचा निर्णय जाहीर केलेला नाही.