Pune Kondhwa अवैधरित्या हातभट्टी दारूची वाहतूक करणाऱ्या टेम्पो दारूचे कॅण्डसह कोंढवा पोलिसांनी केले जेरबंद

तेज पोलीस टाइम्स : पुणे=परवेज शेख

Pune-कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर66 अवैधरित्या गावठी हातभट्टी दारुची वाहतुक करणा-यास टेम्पो व १९ दारुचे कॅण्डसह एकुण २,९८,५२५/- रु. किंमतीचे मुद्देमालासह कोंढवा पोलीस स्टेशनचे तपास पथकाने केले जेरबंद

दिनांक १८/०८/२०२४ रोजी कोंढवा पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे हद्दीमध्ये वाढलेल्या चोरीच्या घटनांच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करत असताना सुरज शुक्ला, शाहीद शेख व लक्ष्मण होळकर असे इस्कॉन चौक ते गोकुळनगर या भागात पेट्रोलिंग करत आले असता दुपारी १३/३० वा. चे सुमारास गोकुळनगर कडे जाणा-या रोडवर पो.सुरज शुक्ला यांना एक तिन चाकी पॅगो टेम्पो गाडी क्रमांक एम.एच/१४/जे.पी/१३५३ ही संशयितरित्या मिळुन आल्याने त्यांनी सदर तिन चाकी पॅगो टेम्पो गाडी रोडचे कडेला थांबवुन त्यामधील चालकास त्याचा नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव अरबाज नजीर सय्यद वय २६ वर्षे रा. गल्ली नं.१७, सय्यदनगर, हडपसर, पुणे असे असल्याचे सांगितले. तेव्हा त्यास सदर गाडीमध्ये काय आहे याबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यास सोबत घेवुन पोलीस स्टेशन येथे आणुन सदर गाडीची तपासणी केली असता सदर पॅगो टेम्पो गाडीमध्ये काळे-निळे रंगाचे कॅण्डमध्ये गावठी हातभट्टीची दारु असल्याचे दिसल्याने लागलीचड्युटी ऑफिसर मपोउपनि स्नेहल जाधव यांनी मा. विनय पाटणकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, व मा.मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे), कोंढवा पोलीस स्टेशन यांना कळवुन त्यांनी कारवाईबाबत आदेश दिल्याने त्यांचे आदेशाप्रमाणे दोन पंचांचे समक्ष सदर पॅगो टेम्पो गाडीची तपासणी करता त्यामध्ये ९८,५२५/- रु. किंमतीची देशी हातभट्टीची तयार दारुचे १९ कॅण्ड प्रत्येक कॅण्डमध्ये ३५ लिटर दारु अशी एकुण ६६५ लिटर दारु तसेच २,००,०००/- रु. किंमतीचा तिन चाकी पॅगो टेम्पो गाडी क्र. एम.एच/१४/जे.पी/१३५३ असलेला असा एकुण २,९८,५२५/- रु. किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने तो आरोपी नामे अरबाज नजीर सय्यद वय २६ वर्षे रा. गल्ली नं. १७, सय्यदनगर, हडपसर, पुणे याचे ताब्यातुन जप्त करण्यात आला आहे.

वरिल नमुद कारवाई मा. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा, सह पोलीस आयुक्त, मा. मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, मा. आर. राजा, पोलीस उप-आयुक्त परि.०५, मा.धन्यकुमार गोडसे, सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, श्री. विनय पाटणकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोंढवा पोलीस स्टेशन, श्री.मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक बालाजी डिगोळे, सपोनि लेखाजी शिंदे, मपोउपनि स्नेहल जाधव, पोलीस हवालदार सतिश चव्हाण, विशाल मेमाणे, निलेश देसाई, गोरखनाथ चिनके, पोलीस अंमलदार सुरज शुक्ला, शाहीद शेख, लक्ष्मण होळकर, संतोष बनसुडे, सुजित मदन, सागर भोसले यांच्या पथकाने केली आहे.

Comments (0)
Add Comment