कोणीही असूदे, आधी थोबाड फोडायचं, मग पोलिसांना सांगायचं, वामन म्हात्रेंवर चित्रा वाघ भडकल्या

प्रदीप भणगे, ठाणे : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्याचप्रमाणे या घटनेचं वार्तांकन करणाऱ्या महिला पत्रकाराविषयी अर्वाच्च भाषा वापरणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृ्त्वातील शिवसेनेचे नेते वामन म्हात्रे यांच्यावरही चित्रा वाघ यांनी भाष्य केलं आहे. ‘तू अशा बातम्या देतेस, जणू तुझ्यावरच बलात्कार झाला आहे’ अशी बेताल टिपण्णी म्हात्रेंनी केली होती. यावर बोलताना “तिथल्या तिथे त्याचं थोबाड का नाही फोडलं?” असा सवाल चित्रा वाघ यांनी विचारला.

चित्रा वाघ काय म्हणाल्या?

“मला हा मुद्दा आता समजला, गुन्हा का नोंद होत नाही याविषयी मी पोलिसांशी बोलते, पण मला असं वाटतं, की कोणीही असूदे, ज्यावेळी असं आपल्याला कुणी बोलतं, तुम्ही का नाही त्याचं थोबाड फोडलं? तिथल्या तिथे थोबाड फोडायला पाहिजे होतं. एवढं ऐकून घेईपर्यंत… मी जर काम करत असताना, मला जर कोणी बोलणार असेल, तर तो कोण आहे, हे मी बघणार नाही हो.. ज्या पद्धतीने आपल्याला असं बोललं जातंय, पोलिसांनी गुन्हा नोंद करायलाच पाहिजे, पण एक महिला म्हणून… सगळ्या ठिकाणी पोलीस पोलीस पोलीस करुन कसं जमेल.. मी सक्षम आहे ना.. मी पत्रकार आहे, मी राजकीय कार्यकर्ती आहे.. मला जर कोणी बोललं तर मी तिथल्या तिथे त्याचं थोबाड फोडेन आणि मग पोलिसांना सांगेन आता करायचं ते करा..” असं चित्रा वाघ म्हणाल्या.
Akshay Shinde Police Custody : बदलापूरचा ‘नराधम’ अक्षय शिंदे मोठ्या पोलीस बंदोबस्तात कोर्टात, कल्याण न्यायालयाचा मोठा निर्णय
“माझं माझ्या सहकाऱ्यांनाही सांगणं आहे. राजकारणात काम करताना आपल्याला अशा प्रकारचा अनुभव येतो. येतो तेव्हा ऐकत बसू नका.. तिथल्या तिथे उत्तर द्या आणि मग पोलिसांकडे जा… तुमच्या केसबद्दल कथोरे साहेब, आपल्याला साहेबांना सांगायला पाहिजे.. अशा पद्धतीने कोणी बोलत असेल, तर ते खपवून घेतलं जाणार नाही… हे पूर्णपणे चुकीचं आहे.. ती पत्रकार आपलं काम करत होती.. तिला अशा पद्धतीने बोलण्याचा कुणाला अधिकार नाही” असं मत चित्रा वाघ यांनी व्यक्त केलं.

Source link

badlapur caseBadlapur NewsChitra Wagh on Badlapur Sexual Assaultwaman mhatreचित्रा वाघ वामन म्हात्रेबदलापूर लैंगिक अत्याचारमहिला पत्रकार शिवसेना नेता सवालवामन म्हात्रे महिला पत्रकार प्रश्न
Comments (0)
Add Comment