फिरायला गेले, पाण्यात उड्या; अंदाज चुकला आणि…तरुणाचा लळींग धबधब्यात बुडून मृत्यू

धुळे : धुळे शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या लळींग धबधब्यामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. चार मित्र एकत्र मंगळवारी २० ऑगस्ट रोजी धबधब्यावर फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी चौघे मित्र पोहण्यासाठी उतरले. मात्र चौघांपैकी एका मित्राचा या धबधब्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जयेश गरुड असं मृत्यू झालेल्या तरुणाचा नाव होतं.

२२ वर्षांचा हा तरुण इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला शिकत होता. त्याचा धबधब्यामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मोहाडी पोलिसांना मिळाल्यानंतर मोहाडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परंतु संध्याकाळी उशीर झाल्याने, काळोख झाल्याने रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यासाठी अडचणी येत होत्या. त्यामुळे संध्याकाळनंतर रेस्क्यू ऑपरेशन थांबवण्यात आलं होतं. त्यानंतर बुधवारी सकाळी पुन्हा रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं आणि या बुडालेल्या तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.
Badlapur Assault Case FIR : दादाने माझे कपडे काढले नि… घाबरलेल्या चिमुकलीने पालकांना सांगितलं, बदलापूर प्रकरणी FIR मध्ये काय?
लळींग धबधब्याच्या ठिकाणी चौघे मित्र संध्याकाळच्या सुमारास फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी पोहण्यासाठी त्यांनी पाण्यात उड्या टाकल्या, परंतु पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे एका तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

पोहणाऱ्यांसाठी बंदी घालण्यात यावी

तरुण बुडालेला लळींग धबधबा हा वनविभागाच्या ताब्यात आहे. त्या ठिकाणी सुरक्षेतेसाठी वनरक्षक नसतात. दरवर्षी या धबधब्यात तरुणांचा पोहण्यादरम्यान मृत्यू होत असल्याच्या घटना मागील काही काळात समोर आल्या आहेत. वन विभागाकडून या धबधब्यात पोहण्यासाठी बंदी घातली गेली, तर अनेकांचे जीव वाचतील, अशी प्रतिक्रिया दिली जात आहे.

हा धबधबा पाहण्यासाठी धुळे जिल्ह्यातील पर्यटक या ठिकाणी मोठ्या संख्येने येत असतात. पर्यटकांसाठी कुठलीही व्यवस्था इथे नाही. वन विभाग प्रशासन याकडे दुर्लक्ष करताना दिसतं. काही पर्यटकांकडून वारंवार या धबधब्याच्या ठिकाणी बंदी घालावी, असं सांगण्यात येतं. परंतु वनविभागातील प्रशासन याकडे लक्ष देत नाही, कोणतीही बंदी नसल्याने धबधब्यात पोहोण्यासाठी आलेल्या अनेकांचा इथे बुडून मृत्यू झाला आहे.

Source link

Dhuledhule man died in waterfalldhule newsधुळे तरुणाचा मृत्यूधुळे बातमीधुळे लळींग धबधब्यामध्ये तरुणाचा मृत्यू
Comments (0)
Add Comment