Badlapur Case :सुरक्षेसाठी महिलांना कोयता वापरण्याची परवानगी द्या! ठाकरे गटाची मागणी

रायगड, अमुलकुमार जैन : बदलापूर येथे दोन चिमुरड्यावर अत्याचाराची घटना घडली. या घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त होत आहे. राज्यात उरण येथे यशश्री शिंदे हिची हत्या, तर आता बदलापूर यामुळे शिवसेना ठाकरे गट आक्रमक होऊन आज रस्त्यावर उतरला. ठाकरे गटाकडून आज कर्जत येथील लोकमान्य टिळक चौकात बदलापूर येथील घटनेचा निषेध करत निदर्शने करण्यात आली. राज्यात लाडकी बहीण योजना केलीत पण या राज्यात सुरक्षित बहीण योजनेची जास्त गरज आहे. या राज्यात लाडक्या बहिणींच्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत. तेव्हा महिलांना आता कोयते वापरण्याची परवानगी द्या म्हणत शिवसेना ठाकरे गटाने राज्यातील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. यावेळी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी देखील करण्यात आली आहे.

राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नुकतंच यशश्री शिंदे हिची निघृण हत्या झाली होती. तर नेरळ येथे बहिणीची छेड काढत जाब विचारणाऱ्या भावाला ४ तरुणांनी बेदम मारहाण केली होती. त्यानंतर बदलापुरात देखील माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली. बालवाडीच्या दोन चिमुकल्यावर शाळेच्या शिपाईने लैगिक शोषण केले. त्यामुळे बदलापुरात जनप्रक्षोभ उसळला. घटनेच्या पार्श्ववभूमीवर कर्जत तालुक्यातून देखील निषेध व्यक्त करण्यात आला आहे. २१ ऑगस्टला कर्जत शहरातील लोकमान्य टिळक चौकामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या पुढाकारातून निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निषेधाचे विविध फलक घेऊन महिलांवरील अत्याचाराचा निषेध व्यक्त करण्यात आला.
Badlapur News : राज्यातील गृहखातं गप्प का बसलंय? बदलापूर घटनेवरून जयंत पाटलांचा फडणवीसांना सवाल

महिलांवरील अत्याचारांसोबतच बालकांना लक्ष करणाऱ्या अशा नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी असा सूर सर्वानीच आळवला. तर मागील महाविकास आघाडी सरकारच्या काळात शक्ती कायदा हा महिलांसाठी आणला गेला होता. त्यावर राष्ट्रपती महोदयांनी अजून सही केलेली नाही. तर राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेपेक्षा सुरक्षित बहीण योजनेची जास्त गरज आहे. राज्यातील महिला सुरक्षित नाही तेव्हा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते दीनानाथ देशमुख यांनी केली. तर नेरळ येथे एक मुलीची छेड काढून तिच्या भावाला बेदम मारहाण करण्यात आली होती. त्यावेळी मोठा जनसमुदाय रस्त्यावर उतरला होता. किती वेळा रस्त्यावर उतरणार, मेणबत्या लावणार ? त्यामुळे तुम्ही महिलांना बंदूक वापरण्याची परवानगी देऊ शकत नसाल तर महिलांना त्यांच्या बचावासाठी कोयते वापरण्याची परवानगी द्या अशी जळजळीत मागणी ठाकरे गटाचे माधव कोळंबे यांनी केली.
Badlapur News : बदलापूर घटनेसंदर्भात आदित्य ठाकरेंकडून राष्ट्रपती द्रौपदी मूर्मूंकडे मोठी मागणी

तर शाळा कॉलेज ठिकाणी पुरुषांना कामाला ठेवताना पोलीस चारित्र्य पडताळणी करावी. ही नीच प्रवृत्ती ठेचून निघाली पाहिजे त्याकरता अशा नराधमांना जनतेसमोर भर चौकात फाशी द्या अशी मागणी ठाकरे गटाच्या जिल्हा संघटिका सुवर्ण जोशी यांनी केली. तसेच चिमुरड्यांवर अशा प्रकारच्या घटना घडतात तेव्हा पोलीस प्रशासनाने घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ गुन्हा दाखल करणं अभिप्रेत आहे. मात्र बदलापूर घटनेत पालकांना बसवून ठेवण्यात आलं. १२ तास गुन्हा दाखल करायला लागले. पोलिसांवर महायुतीच्या काळात किती दबाव आहे हे यातून दिसून येत हे जनतेसाठी हानीकारण आहे अशी प्रतिक्रिया उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी व्यक्त केली. यावेळी जमलेल्या जनतेने देखील या घटनेचा निषेध व्यक्त करत गुन्हा दाखल करायला १२ तास का लागले यावर प्रश्न उपस्थित केले.

यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नितीन सावंत, तालुकाप्रमुख उत्तम कोळंबे, उपतालुकाप्रमुख सुरेश गोमारे, संघटक बाबू घारे, नेरळ शहरप्रमुख बंडू क्षीरसागर, कर्जत शहरप्रमुख निलेश घरत, कृष्णा जाधव, माधव कोळंबे, कॉलेज कक्ष प्रमुख सुजल गायकवाड, महिला जिल्हा संघटिका सुवर्ण जोशी, काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते दीनानाथ देशमुख आदींसह मोठ्या प्रमाणात शिवसेना ठाकरे गटाचे युवाप्रमुख, महिला आघाडी शिवसैनिक , व नागरिक उपस्थित होते.

Source link

badlapur caseladki bahin yojnathackeray campकोयताठाकरे सेनाबदलापूर केसबदलापूर क्राइमबदलापूर स्कूलशिवसेना
Comments (0)
Add Comment