मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कोल्हापुरात येण्याच्या एक दिवस अगोदर कोल्हापुरात महायुतीला तीन मोठे धक्के

कोल्हापूर (नयन यादवाड) : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरात राजकीय वातावरण आता तापू लागल असून नाराज असलेले नेते धक्का तंत्राचा वापर करू लागले आहेत. मात्र याचा सर्वाधिक फटका महायुतीला बसू लागला आहे. उद्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री कोल्हापूर दाखल होत आहेत मात्र याच्या एक दिवस अगोदरच महायुतीला एकाच दिवसात तीन मोठे धक्के बसले आहेत.

भाजप नेते समरजीत सिंह घाटगे हे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तर अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष ए वाय पाटील यांनी देखील पदाचा राजीनामा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठवला आहे. यामुळे महायुतीच्या तीन मुख्य नेत्यांच्या दौऱ्याच्या एक दिवस आधीच महायुतीला मोठे धक्के लागले आहेत.
Ambernath Hit And Run Case: मुलानेच केला वडिलांच्या खुनाचा प्रयत्न; अंबरनाथ हिट अँड रन प्रकरणावर आली मोठी अपडेट

जिल्ह्यातले महायुतीचे तीन मुख्य चेहरे महाविकास आघाडीच्या वाटेवर

2019 नंतर राज्यात झालेल्या राजकीय भूकंपानंतर महाविकास आघाडी आणि महायुती उदयास आली. यातच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेल्या बंडखोरीमुळे राज्याच्या राजकारणात मोठे बदल झाले आहेत. महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सामील झाल्याने अनेक ठिकाणी आता नाराजीचे सूर दिसू लागले आहेत. शिवाय विधानसभेसाठी जागा कमी आणि इच्छुक जास्त असल्याने जागा वाटपावरून वरिष्ठांची डोकेदुखी ही वाढली आहे.
Supriya Sule: राज्याचे गृहमंत्री दिल्लीत असतात कारभार कोण पाहतं हेच कळत नाही; सुप्रिया सुळेंचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा

विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला मोठे धक्के सहन करावे लागत असून महायुतीमधील तीन मुख्य चेहरे महाविकास आघाडीच्या वाटेवर आहेत. भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेले समरजीत सिंह घाटगे गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू होत्या अशातच ते लवकरच शरद पवार गटात पक्ष प्रवेश करणार आहेत या पाठोपाठ आता भाजप जिल्हाध्यक्ष राहुल देसाई, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष ए वाय पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत महायुतीमध्ये आज खळबळ उडवून दिली आहे.

भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांचा राजीनामा

भाजपाचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला असून त्यांच्या जागी नाथाजी पाटील यांना जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. देसाईंच्या राजीनाम्याने राधानगरी विधानसभा मतदारसंघात एकच खळबळ उडाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीमुळे ही जागा शिंदे गटाला जाणार असल्याचे संकेत मिळत असल्याने येथे पुन्हा आबिटकर यांनाच तिकीट मिळण्याची शक्यता असल्याने देसाई यांना उमेदवारी मिळणार नसल्याचे चित्र स्पष्ट होते. पाच वर्षांपूर्वी चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. मात्र सत्तेचा कोणताही लाभ त्यांना मिळाला नसल्यामुळे त्यांच्यावर कार्यकर्त्यांनी दबाव वाढवला होता. त्यामुळे त्यांची घुसमट होणार होती. यामुळे त्यांनी भाजपमधून बाहेर पडत वेगळी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
Rahul Gandhi On Badlapur Incident: बदलापुरमधील घटनेवर राहुल गांधी सर्वांच्या मनातले बोलले; केले मोठे वक्तव्य, आता FIRसाठी आंदोलन करायचे का?

कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), काँग्रेस, शिवसेना (उध्दव ठाकरे) यापैकी कोणत्या पक्षात प्रवेश करणार याचा निर्णय घेणार आहेत. मात्र, आमदार सतेज पाटील यांच्याशी त्यांच्या घराण्याचे जूने संबंध, घराण्यातील दोन पिढ्यांचा काँग्रेस पक्षासोबत आहेत. विधानसभा निवडणुकीत उमेदवारीचा शब्द घेऊन ते भविष्यातील त्यांची राजकीय वाटचाल महाआघाडीच्या बाजुने रहाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष ए वाय पाटील महाविकास आघाडीच्या वाटेवर

तर यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष ए वाय पाटील यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा आज संध्याकाळच्या सुमारास अजित पवार यांच्याकडे सोपवला आहे. यामुळे महायुतीला बसलेला हा तिसरा धक्का म्हणावा लागेल. ए. वाय. पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत राधानगरी-भुदरगड विधानसभा महायुतीकडून तिकीट मिळत नसल्याचे संकेत मिळाल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडी सोबत जवळीक वाढवली होती. गेल्या चार महिन्यापासून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे काम थांबविले होते. तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देखील त्यांनी युतीधर्म डावलून काँग्रेसला पाठिंबा दिला होता.

काँग्रेस उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांना पाठिंबा देत जोरदार प्रचार आणि शक्ती प्रदर्शन देखील केले होते. महायुती मधून सध्या या मतदारसंघातून विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर आहेत. तसेच ए.वाय. पाटील यांचे पाहुणे के. पी. पाटील हे देखील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये असून तेही विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याने ए.वाय. पाटील यांनी काँग्रेसकडे गेल्या काही महिन्यांपासून जवळीक साधली आहे. राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघातून आज एकाच दिवसात दोन मोठ्या पक्षाच्या नेत्यांनी दिलेले धक्के हे राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा विषय झाला आहे.

Source link

big blow to mahayuti in kolhapurkolhapur local newskolhapur news in marathiKolhapur Politicsmaharashtra politics latest updateउपमुख्यमंत्री अजित पवारउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमुख्यमंत्री एकनाथ शिंदेमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाविधानसभा निवडणूक २०२४
Comments (0)
Add Comment