‘भाजपकडून लढलेला माणूस भाजपशी संबंधित संस्थेतल्या अत्याचाराची केस कशी लढणार? निकम नकोच’

मुंबई : बदलापूरच्या नामांकित शाळेत झालेल्या लहान मुलींवर लैंगिक अत्याचार घटनेचा खटला चालविण्यासाठी राज्य शासनाकडून ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीला विधान सभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी विरोध दर्शवला आहे. ज्यांनी भाजपच्या चिन्हावर लोकसभा निवडणूक लढवली ते भाजपशी संबंधित शिक्षणसंस्थेत झालेल्या अत्याचाराची चौकशी कसे करणार? उद्या हे प्रकरण दाबले गेले तर त्याला जबाबदार कोण? असे प्रश्न विचारून निकम यांच्या नियुक्तीस त्यांनी विरोध केला.

बदलापूर शहरातील एका नामांकित शाळेच्या शिशू वर्गातील दोन विद्यार्थिनींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याची शनिवारी उघडकीस आली. पीडितेच्या कुटुंबियांची तक्रार घेण्यास पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप होत आहे. तसेच पीडितांवर लगोलग उपचार करण्यासही डॉक्टरांनी टाळाटाळ केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. घृणास्पद घटनेच्या चौकशीसाठी पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच घटनेचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी राज्य शासनाकडून ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली.
राज्यातील सरकार राज्यघटनेवर बलात्कार करून आलंय, त्यांचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवायला पाहिजे : संजय राऊत

विजय वडेट्टीवार-सुषमा अंधारे काय म्हणाल्या?

बदलापूर प्रकरणात उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून केलेल्या नेमणुकीस विजय वडेट्टीवार आणि सुषमा अंधारे यांनी आक्षेप नोंदविला आहे. ज्या शिक्षण संस्थेत अत्याचार झाला ती संस्था भाजपशी संबंधित आहे. त्याच पक्षाच्या संबंधित वकिलाची विशेष वकील म्हणून नेमणूक केली ज्याने लोकसभा निवडणूक लढवली. उद्या हे प्रकरण दाबले गेले तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल करीत निकम यांच्याऐवजी दुसऱ्या वरिष्ठ वकिलाची नेमणुक व्हावी, अशी मागणी दोन्ही नेत्यांनी केली.
Badlapur Protest : सरकारला बदनाम करण्यासाठी बदलापूरचं आंदोलन, लाडकी बहीण योजनेविरोधात लगोलग बॅनर कसे छापले? : मुख्यमंत्री शिंदे

…प्रसंगी संस्थाचालकांवरही कारवाई करण्यात येईल- फडणवीस

‘सरकारने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. आरोपीवर कठोर कारवाई व्हावी यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्याचे निर्देश दिले आहेत’, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली; तसेच अशा प्रकारच्या घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकांवरही कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. याप्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

‘एसआयटी’ करणार तपास

बदलापूर येथील घृणास्पद घटनेच्या चौकशीसाठी पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. सुरुवातीला कारवाईत विलंब करणारे बदलापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना दिले असल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली.

Source link

badlapur girls sexual assaultbadlapur girls sexual assault casesushma andhareujjwal nikamujjwal nikam lawyer badlapur caseUjjwal Nikam Newsउज्वल निकम यांच्या नियुक्तीला विरोधबदलापूर अत्याचार आंदोलनविजय वडेट्टीवारसुषमा अंधारे
Comments (0)
Add Comment