बदलापूरच्या आंदोलनामागे राजकीय प्रेरणा, बाहेरून लोक गाड्या भरून येत होते, CM शिंदेंना संशय

मुंबई : बदलापुरात चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचाराची घटना दुर्दैवी आहे परंतु घटनेच्या निषेधार्थ झालेले आंदोलन राजकीय दृष्टीने प्रेरित होते. आंदोलनात स्थानिक लोक असायला हवे होते. तिथे स्थानिक लोक हाताच्या बोटावर मोजण्याइतपत होते. बाकी सगळे आंदोलक बाहेरचे होते. इतर ठिकाणांवरून गाड्या भरून लोक येत होते. मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलकांची समजूत काढूनही लोक ऐकायला तयार नव्हते. सरकारला बदनाम करण्यासाठी मंगळवारी बदलापूरमध्ये आंदोलन झाले, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. चिमुरड्यांच्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी आलेल्या आंदोलकांच्या हातात लाडकी बहीण योजनेविरोधातले बॅनर कसे काय आले? असा सवालही त्यांनी विचारला.

बदलापूर शहरातील एका नामांकित शाळेच्या शिशू वर्गातील दोन विद्यार्थिनींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ बदलापूरकरांनी मंगळवारी ‘बदलापूर बंद’ची हाक दिली होती. मात्र, सकाळी सहाच्या सुमारास हजारोच्या संख्येने जमलेल्या जनसमुदायाला शाळा प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने लोकांच्या संतापाचा उद्रेक झाला. हाच उद्रेक राजकीय प्रेरित असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
राज्यातील सरकार राज्यघटनेवर बलात्कार करून आलंय, त्यांचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवायला पाहिजे : संजय राऊत

आंदोलकांच्या हातात लाडकी बहीण योजनेविरोधातले बॅनर कसे काय आले?

आंदोलकांच्या मागण्या सरकारने मान्य करूनही ते रेल्वे रुळावरून उठत नव्हते. त्याचवेळी अत्याचाराचा निषेध करण्यासाठी आलेल्या आंदोलकांच्या हातात लाडकी बहीण योजनेविरोधातले बॅनर कसे काय आले? लाडकी बहीण योजना नको, लेक सुरक्षा योजना हवी, असे लोक कसे काय म्हणू लागले? याचाच अर्थ त्यांना, सरकारला बदनाम करायचं होतं, असा आरोप मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.
Badlapur Case : बदलापूर रेल्वे आंदोलन, अनेक कॉल रेकॉर्डिंग हाती; पोलिसांचे मोठे खुलासे

बदलापूरच्या आंदोलनात स्थानिक हाताच्या बोटावर मोजण्याइतके, बाहरून गाड्या भरून भरून लोक येत होते!

जेव्हा कुठे आंदोलन होते तेव्हा तिथे स्थानिक लोक असतात. इथे स्थानिक हाताच्या बोटावर मोजण्याइतके होते. इतर ठिकाणांहून गाड्या भरुन भरुन आंदोलक आले होते. सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाताला लागले असून ते यासंबंधी पुढील चौकशी करत आहेत. तब्बल ८-९ तास रेल्वे रोखणं हे देशाचे, रेल्वे संपत्तीचे नुकसान नुकसान असल्याची टिप्पणी त्यांनी केली. राजकारण करायला खूप गोष्टी आहेत, एका लहान बच्चूसोबत जे घडलं त्याचं तुम्ही राजकारण करता, ज्याने केलं त्याला लाज वाटली पाहिजे, अशा शब्दात त्यांनी आंदोलनाचे खापर विरोधकांवर फोडले.

लाडकी बहीण योजनेचे नाव घेताना मुख्यमंत्री गडबडले

आंदोलकांच्या हातातील बॅनरवर असलेल्या योजनेचा उल्लेख करताना मुख्यमंत्री गडबडले. लाडकी बहीण योजनेचे नाव घेताना त्यांची धांदल उडाली. लेक लाडकी… मुख्यमंत्री माझी लाडकी.. अशी चुकीची नावे घेऊन झाल्यावर सरतेशेवटी लाडकी बहीण योजनेचे नाव मुख्यमंत्र्यांनी घेतले.

Source link

Badlapur girls sexual assault agitationbadlapur girls sexual assault caseCM Eknath ShindeEknath Shinde on badlapur Caseबदलापूर अत्याचार घटनामुख्यमंत्री एकनाथ शिंदेलाडकी बहीण योजना
Comments (0)
Add Comment