Waman Mhatre: महिला पत्रकारासाठीचे आक्षेपार्ह विधान भोवले, वामन म्हात्रेंवर विनयभंगाचा गुन्हा दाखल

म. टा. वृत्तसेवा, बदलापूर : शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्याविरोधात विनयभंग आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हात्रेंवर कारवाई करावी, या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या नेत्या सुषमा यांनी पोलिस ठाण्याबाहेर दिवसभर ठिय्या आंदोलन केले.

बदलापूर येथील आंदोलन आणि शहरातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस आणि प्रशासनाकडून प्रयत्न होत असताना बुधवारी महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी सकाळपासून शहरात हजेरी लावली. महिला पत्रकाराविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी अंधारे यांनी पोलिस ठाण्याबाहेर आंदोलन केले. वार्तांकन करणाऱ्या महिला पत्रकाराशी या भाषेत बोलण्याचा मस्तवालपणा कुठून येतो, असा प्रश्न त्यांनी केला. अखेर संध्याकाळी सहा वाजता म्हात्रेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
लाडकी बहीण सुरक्षित नाही! विरोधकांचा एकसूर; बदलापूरचे आंदोलन राजकीय, सत्ताधाऱ्यांचा दावा
दरम्यान, वामन म्हात्रेंवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. मात्र आपल्याला कोणी काही बोलले त्याचवेळी त्याचे थोबाड फोडले पाहिजे, पुढे जे होईल ते बघू असे सांगत चित्रा वाघ यांनी म्हात्रे यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला.
Akola : सहा विद्यार्थिनींचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकावर आणि शाळेवर सरकारची कडक कारवाई

वामन म्हात्रेंचं विधान काय?

बदलापूरात आंदोलन सुरु असताना वामन म्हात्रे महिला पत्रकाराला उद्देशून म्हणाले होते की, ‘तु अशा बातम्या देते जणू तुझ्यावरच बलात्कार झाला आहे’. वामन म्हात्रेंच्या या वादग्रस्त विधानावर पत्रकारांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली होती. त्याचबरोबर विरोधकांनी देखील म्हात्रे यांच्यावर हल्लाबोल केला. बुधवारी मविआच्या नेत्यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरल्यावर म्हात्रेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

म्हात्रेंकडून बचावाचा प्रयत्न

मी असे कोणतेही वक्तव्य केले नाही. या प्रकरणात माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे. आंदोलनाच्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने माहिती पोहोचवली जात होती. बलात्कार या शब्दाचा वापर केला जात होता. नक्की काय झाले याची माहिती घ्या, असे आवाहन मी पत्रकारांना केले. मात्र त्याचा चुकीचा अर्थ घेतला गेला, अशी प्रतिक्रिया वामन म्हात्रे यांनी दिली.

Source link

badlapur incidentbadlapur protestcase registered on waman Mhatreshivsena leaderwaman mhatreअॅट्रॉसिटीचा गुन्हाबदलापूर अत्याचार प्रकरणमहिला पत्रकारासाठी आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा गुन्हावामन म्हात्रेशिवसेना नेते वामन म्हात्रेंविरोधात गुन्हा
Comments (0)
Add Comment