निवासी डॉक्टरांचा संप कायम, ओपीडीवर सर्वाधिक परिणाम, रुग्णसेवा विस्कळीत होण्याच्या मार्गावर

म. टा. प्रतिनिधी, पुणे : निवासी डॉक्टरांच्या संपाचा सर्वाधिक फटका ससून रुग्णालयातील रुग्णसेवेला बसत आहे. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या संपामुळे रुग्णसेवा विस्कळित होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे अतिरिक्त डॉक्टर उपलब्ध व्हावेत यासाठी ‘ससून’ प्रशासन प्रयत्न करीत आहे.

‘ससून’वर रुग्णसेवाचा ताण असतानाच निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत. संपामुळे रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून पिंपरी-चिचंवड महापालिका, पुणे महापालिका, राज्याचा आरोग्य विभागासह एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर उपलब्ध करून देण्याची विनंती ‘ससून’ प्रशासनाने केली आहे. याबाबत संबंधित विभागांच्या प्रमुख्यांना पत्र पाठविण्यात आले आहे; परंतु विनंतीचे पत्र पाठ‌वून पाच दिवस झाले असतानाही संबंधित विभागांकडून कोणतेही उत्तर ससून प्रशासनाला प्राप्त झालेले नाही. त्यामुळे ससून प्रशासनाला उपलब्ध असलेले डॉक्टर, कर्मचाऱ्यांवर काम करावे लागत आहे.
Rahul Gandhi On Badlapur Incident: बदलापुरमधील घटनेवर राहुल गांधी सर्वांच्या मनातले बोलले; केले मोठे वक्तव्य, आता FIRसाठी आंदोलन करायचे का?
बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय ससून रुग्णालयाशी संलग्न आहेत. ‘बीजे’मध्ये ५६६ निवासी डॉक्टर आहेत. याच निवासी डॉक्टरांमार्फत विविध विभागांतील रुग्णसेवा केली जाते. संपामुळे निवासी डॉक्टर केवळ अत्यावश्क सेवा देत आहेत. परिणामी आपत्कालीन विभाग वगळता अन्य सर्व विभागांवर संपाचा परिणाम झाला आहे. सर्वाधिक फटका बाह्यरुग्ण विभाग आणि शस्त्रक्रिया विभागाला बसत आहे. नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.
Kolkata Doctor Case: आरजी करमधील ‘ती’ भिंत का पाडली? सीबीआयच्या प्रश्नांवर माजी प्राचार्याची चिड आणणारी उत्तरं

बुधवारची आकडेवारी

  • ओपीडी : १३३७
  • आयपीडी : ९५०
  • गंभीर शस्त्रक्रिया : २६
  • किरकोळ शस्त्रक्रिया : ४०
  • प्रसूती : १४
  • आयसीसू : १०१

बंगालमध्येही आरोग्यसेवा कोलमडली

कोलकाता येथील आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात एका प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरची बलात्कारानंतर हत्या झाल्याच्या घटनेनंतर सरकारी डॉक्टरांमध्ये निर्माण झालेला क्षोभ कमी होताना दिसत नाही. या घटनेच्या निषेधार्थ सरकारी रुग्णालयातील कनिष्ठ डॉक्टरांनी संप पुकारला असून त्यांचे आंदोलन बुधवारी, सलग तेराव्या दिवशीही सुरू होते. या आंदोलनामुळे पश्चिम बंगालच्या सरकारी रुग्णालयांतील आरोग्यसेवा कोलमडली आहे. या आंदोलनामुळे सरकारी रुग्णालयाबाहेर रुग्णांच्या लांबलचक रांगा लागल्याचे दिसत आहे. ‘रुग्णालयात पुरेसे डॉक्टर नसल्याने रुग्णांना दाखल करून घेणे आम्ही टाळत आहोत,’ अशी माहिती कोलकाता नॅशनल मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलच्या एका अधिकाऱ्याने दिली.

Source link

doctors strike on trainee doctor rapePatient Treatment disruptPune newsrg kar college incidentsasoon hospitalआरजी तर रुग्णालय प्रकरणडॉक्टर महिला हत्या प्रकरणपुणे ब्रेकिंग बातम्यापुणे रुग्णसेवा ठप्पससून रुग्णालयात आंदोलन
Comments (0)
Add Comment